शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आजची आंदोलने म्हणजे हक्क मिळविण्याचा राजमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:47 IST

आदिकाळापासून माणूस आपल्या हक्कांसाठी लढत आला आहे. त्या वेळी, रानटी माणसाला स्वार्थ हेच हक्क वाटायचे; पण जसजसा माणूस समाजप्रिय आणि सुसंस्कृत होत गेला तसतशी त्याच्या हक्कांवर म्हणजे स्वार्थावर मर्यादा यायला लागल्या.

अरुण पाटील

एखादी गोष्ट आपल्याला मिळायलाच हवी असे ज्या वेळी वाटते, तेव्हा तो आपला हक्कच आहे असे आपल्याला वाटू लागते. तो हक्क न मिळणे म्हणजे आपल्यावर झालेला मोठा अन्यायच आहे, अशी आपली समजूत होते. म्हणून ती गोष्ट मिळविण्यासाठी आपण विविध मार्गांचा अवलंब करतो. आपण आपले हक्क किंवा मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करतो; पण हे करताना हक्कांबरोबर आपले कर्तव्य मात्र सोयीस्कररीत्या विसरतो. आपण आपले कर्तव्य योग्यरीत्या निभावले, तरच दुसऱ्यांना त्यांचा हक्क मिळू शकतो. आपण ज्याला हक्क म्हणतो, तो आपला केवळ स्वार्थ तर नाही ना? याचाही विचार व्हायला हवा.

आदिकाळापासून माणूस आपल्या हक्कांसाठी लढत आला आहे. त्या वेळी, रानटी माणसाला स्वार्थ हेच हक्क वाटायचे; पण जसजसा माणूस समाजप्रिय आणि सुसंस्कृत होत गेला तसतशी त्याच्या हक्कांवर म्हणजे स्वार्थावर मर्यादा यायला लागल्या. कारण, एका समूहाचे हक्क हे दुसºया समूहाच्या हक्कांच्या आड यायला लागले. दुसºया समूहाचेही हक्क जपणे, ही आपली जबाबदारी झाली; पण स्वत:च्या हक्कांचा दुसºयाच्या हक्कासाठी त्याग करणे, ही मानवाची सहज प्रवृत्ती नसल्याने समूहासमूहात वाद आणि भांडणं व्हायला लागली आणि आपल्या हक्कांवर मर्यादा यायला लागल्या. म्हणून माणसाला आपले हक्क मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे आंदोलने करावी लागली.

हक्क मिळविण्याचे मार्गएखाद्या व्यवस्थेकडून आपले हक्क मिळविण्यासाठी आंदोलनाचे अनेक मार्ग असतात.शांततापूर्ण अहिंसक आंदोलनेयात सविनय कायदेभंग, असहकार, सत्याग्रह, चर्चा, काळ्या फिती लावून निषेध करणे, काम बंद आंदोलन इत्यादी.कायदेशीर मार्ग :कोर्टाच्या माध्यमातून लढणे.हिंसक / धाकदपटशांचा मार्ग :मोर्चा काढणे, बंद पुकारणे, रास्ता रोको, चक्का जाम इत्यादी.

दहशतवादी मार्ग : शस्त्रांच्या साहाय्याने धाक दाखवून, घाबरवून, खूनखराबा करून, दहशत निर्माण करून इत्यादी.तडजोडीविना धाकदपटशाने भरपूर पगारवाढ मिळविताना कंपनीच्या आयोजकांचा वा व्यवस्थापनाचा विचार न केल्यामुळे कंपन्या डबघाईस आल्या. सोन्याचे अंडी देणारी कोंबडीच कापून सर्व अंडी एकदम मिळवण्याच्या लालसेने आणि घमेंडीमुळे १९८२ चा सूतगिरण्यांचा संपदेखील फसला. गिरण्या संपल्या. या एका फसलेल्या संपामुळे मराठी गिरणी कामगार मुंबईबाहेर फेकला गेला तो कायमचाच ! या नकारात्मक सामाजिक, आर्थिक स्थित्यंतराचे परिणाम आपण आजही भोगत आहोत.

बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या भल्याचा विचार करून १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. जबरदस्त एकमुखी नेतृत्व आणि अनुयायांमध्ये पूर्णपणे पकड असणारा हा एकमेव नेता ! मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेने अनेक आंदोलने केली. शिवसेना संपात सहभागी आहे वा शिवसेनेचा बंदला पाठिंबा आहे, असे म्हटल्यावर संप आणि बंद यशस्वी व्हायला लागले. बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून दिलेल्या लढतीत १९६९ साली शिवसेनेने संयुक्त महाराष्ट्राच्या यज्ञात ६८ हुतात्म्यांच्या समिधा वाहिल्या. मराठी माणसाच्या रोजगारावर गदा आणतात म्हणून १९७० मध्ये हिंसक आंदोलने झाली; पण नंतर शिवसेना मराठी माणसाकडून हिंदुत्वाकडे वळली. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी ते अपरिहार्यच होते. नंतरचा शिवसेनेचा जमाखर्च आपल्या डोळ्यापुढे आहेच.सध्याची आंदोलने : सध्या राजकीय पक्षनिहाय, धर्म व जातीनुसार प्रामुख्याने आंदोलने होत आहेत. मराठ्यांचे आरक्षणाचे आंदोलन, गुजरातमधील पटेलांचे आंदोलन, ‘पद्मावत’ सिनेमावरून झालेले आंदोलन, ३ जानेवारी २०१८ ला कोरेगाव-भीमा निमित्ताने झालेला महाराष्ट्र बंद.

महाराष्ट्रातील आंदोलनांचा (चळवळींचा आढावा)अ) स्वातंत्र्यपूर्व आंदोलने : ब्रिटिश काळात झालेली बहुतेक आंदोलने अर्थातच भारतीयांच्या न्याय्य हक्कांसाठी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरु द्ध भारतीयांनी केलेली आंदोलने होती. कोलकाता आणि नागपूर येथे १९२० साली भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीच्या असहकाराच्या तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला. नंतर सविनय कायदेभंग आणि अहिंसेवर आधारित असहकार या दोन सत्याग्रही तंत्रांच्या साहाय्याने महात्मा गांधींनी काँग्रेसचा लढा दिला. दांडी यात्रेसारख्या सविनय कायदेभंगाच्या मिठाच्या सत्याग्रहाद्वारे गांधीजींनी जनतेत नैतिक जागृती निर्माण केली. याच नैतिक शक्तीमुळे स्वातंत्र्याचे आंदोलन यशस्वी होऊ शकले. तसेच, क्रांतिकारकांच्या सशस्त्र चळवळीही स्वातंत्र्य मिळण्यास कारणीभूत ठरल्या; पण महात्मा गांधींची शांततापूर्ण अहिंसक चळवळ असो की, क्रांतिकारकांची सशस्त्र चळवळ, या सर्व चळवळी वैयक्तिक हक्कांसाठी नसून स्वातंत्र्य मिळविण्याच्या उदात्त हेतूने, देशप्रेमाने प्रेरित होऊन एकजुटीने ब्रिटिश सत्ता उलथविण्याची मोहीम होती.

ब) स्वातंत्र्योत्तर आंदोलने : ही मुख्यत: एका समूहाच्या हक्कांसाठी एखाद्या सरकारी वा खासगी व्यवस्थेविरु द्ध केलेली आंदोलने होती. या काळाचा विचार करता कॉम्रेड डांगे, जॉर्ज फर्नांडिस, डॉ. दत्ता सामंत, बाळासाहेब ठाकरे या समाजनेत्यांचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. कॉम्रेड डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य आणि भारतीय मजदूर युनियनच्या आंदोलनाचे प्रमुख नेते होते. त्यांचे गिरणी कामगार तसेच अन्य कामगार वर्गावरही अविवादित प्रभुत्व होते. कामगारांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर लढले.

१९७० च्या दशकात मुंबई-ठाण्यातील औद्योगिक विश्वात कामगारवर्गाच्या संघटनांवरील तसेच राजकीय वर्चस्वासाठी लढण्याकरिता अनेक पुढारी पुढे आले. त्यात प्रामुख्याने जॉर्ज फर्नांडिस व डॉ. दत्ता सामंत हे होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी आणीबाणीपूर्व काळात १९७४ साली दीर्घकाळ चाललेला व शेवटी अयशस्वी झालेला रेल्वेचा संप घडवून आणला; पण शक्तीच्या अवास्तव कल्पनेमुळे आणि पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कणखरपणामुळे हा संप बारगळला. योग्य वेळी संपात माघार घेणेही तितकेच महत्त्वाचे ! १९७० च्या दशकात डॉ. दत्ता सामंत यांचा इंटकचा प्रमुख नेता म्हणून उदय झाला. आक्र मक व झुंझार कामगार नेते म्हणून ते प्रसिद्ध झाले. खासगी कंपन्यांतील वेतनवाढीसाठी, बोनससाठी अनेक लढे त्यांनी आक्र मक धोरणांनी यशस्वी करून दाखवले; पण त्याचबरोबर वेतनवाढीच्या अव्वाच्या सव्वा मागण्या करताना त्यांनी कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे डोळेझाक केली.