रंगायतनमध्ये आज राष्ट्रीय मतदार दिन सोहळा

By Admin | Updated: January 25, 2017 04:36 IST2017-01-25T04:36:58+5:302017-01-25T04:36:58+5:30

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यामध्ये याही वर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत.

Today, the National Voters Day Celebration in Rangayatan | रंगायतनमध्ये आज राष्ट्रीय मतदार दिन सोहळा

रंगायतनमध्ये आज राष्ट्रीय मतदार दिन सोहळा

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यामध्ये याही वर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. यानुसार जिल्हास्तरीय कार्यक्रम येथील राम गणेश गडकरी रंगायतनात येथे होणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच काही नामवंत मराठी चित्रपट कलाकारही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
विविध कार्यक्रमासाठी अभिनेत्री अमिषा पटेल, संपदा कुलकर्णी, उदय सबनीस आदींसह इतर मराठी सिनेकलावंत यावेळी उपस्थित राहतील. याप्रसंगी ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा कळवा या विधानसभा मतदार संघातील नवीन मतदार व ज्येष्ठ नागरिकांना नविन स्मार्ट निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहेत. याशिवाय उपस्थितांना बांदोडकर कॉलेज, ठाणे येथील एनसीसी व एनएसएसचे चे विद्यार्थी ‘मतदानाचे महत्व ’ या विषयावर पथनाट्य व भाषण सादर करणार आहेत.
जिल्ह्यातील मनपा कार्यक्षत्रातील शिक्षण विभाग व विधानसभा मतदार संघातील निवडणूक नायब तहसिलदार यांचे सहाय्याने सात तालुक्यातील दहा ठिकाणी १५ ते १७ वयोमानातील ३२५ शालेय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘प्रत्येक मत मोलाचे’ या विषयावर चित्रकला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातून १८ विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच ‘भिंती रंगवा ठाणे सजवा’ या मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ‘सक्षम करु या युवा व भावी मतदार’ या विषयावर भिंतीचित्र रंगविण्यात येणार आहे.

Web Title: Today, the National Voters Day Celebration in Rangayatan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.