कल्याण-पनवेल मार्गावर आजपासून शिवशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:48 IST2018-06-25T00:47:59+5:302018-06-25T00:48:16+5:30
ठाणे-तीनहातनाका-पवई मार्गे बोरीवली आणि ठाणे-पनवेल पाठोपाठ आता कल्याण-पनवेल या मार्गावर शिवशाही बस सोडण्याचा

कल्याण-पनवेल मार्गावर आजपासून शिवशाही
ठाणे : ठाणे-तीनहातनाका-पवई मार्गे बोरीवली आणि ठाणे-पनवेल पाठोपाठ आता कल्याण-पनवेल या मार्गावर शिवशाही बस सोडण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य परिवहनच्या ठाणे विभागाने घेतला आहे. तसेच कल्याण-पनवेल या शिवशाही बसबरोबर मुलुंंड-पनवेल या नवीन मार्गावर येत्या सोमवारी एशियाड बसेस धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे-बोरीवली आणि ठाणे-भार्इंदर या शिवशाही बसला ८४ आणि ८६ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. त्याचबरोबर इतरही मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेसला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-पनवेल हा मार्गावर शिवशाही बस सुरू करावी अशी प्रवाशांकडून मागणी पुढे आली. त्यातच, यामार्गावर मोठ्याप्रमाणात उच्चभ्रू प्रवासी असल्याने सोमवारपासून कल्याण-पनवेल ही शिवशाही बस सुरू होत आहे. या मार्गावर कल्याणमधून दिवसभरात साध्या बसच्या ८६ फेºया होत आहेत. तसेच सोमवारपासून धावणाºया ३ शिवशाही बसच्या आणखी १८ फेºयांची भर पडणार आहे. शिवशाही बससाठी साध्या बसपेक्षा २० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. साध्या बसचे तिकीट ४५ रुपये असून शिवशाहीचे तिकीट ६५ रुपये असणार आहे.
तसेच ठाणे एसटी विभागाने मुलूंडवरून पनवेलला जाणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन हा मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर एशियाड बस सोमवारपासून सुरू होत आहे. या ७ बस जवळपास ३० ते ३५ फेºया दिवसभरात मारणार असून ही बस मुलुंडवरून आनंदनगर जकातनाकामार्गे ऐरोली, रबाले करून पुढे पनवेल जाणार आहे. या बसचे तिकीट साधारणपणे ६० रुपये असणार आहे. या मार्गावर प्रतिसाद लाभल्यास भविष्यात शिवशाहीही बस सोडण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.