शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

टीएमटीच्या तेजस्विनीला मिळणार १२५ कंत्राटी महिला वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:31 AM

वाहतूककोंडीवर उतारा : १८ आसनी मिनी पोस्ट बस खरेदी करणार

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ताफ्यात खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमध्ये वाहक (कंडक्टर) मात्र पुरुषच होते. त्यावर महिला प्रवाशांची नाराजी होती. त्यासाठी आगामी आर्थिक वर्षामध्ये १२५ कंत्राटी महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तीन कोटी २२ लक्ष रकमेची तरतूद केली आहे.

ठाणे परिवहन उपक्र माच्या वागळे आगारामधील कै. मिनाताई ठाकरे सभागृहामध्ये मंगळवारी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेमध्ये परिवहनचे व्यवस्थापक संदिप माळवी यांनी प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांच्याकडे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ४३८ कोटी ८६लाख रु पयांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये वातानुकुलित १०० इलेक्ट्रिक बस, उर्वरित २० पैकी दहा तेजस्विनी परिवहनच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. त्यात १२५ कंत्राटी पद्धतीने महिला वाहकांची नेमणूक केली जाणार आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे महिलांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवाय, ई-तिकीटसाठी ईटीआयएम मशीन, नादुरु स्त १०३ सीएनजी बसगाड्यांची दुरु स्ती करणे, नवीन ५० मिडी बसऐवजी त्याच खर्चातून शंभर मिनीपोस्ट बस घेण्याची योजनाही आहे. दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलत, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतअशी अर्थसंकल्पाची वैशिष्टये आहेत.बस निवाऱ्यांवर १०६ एलईडी टीव्ही बसवून त्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्याचे हक्क देणे, परिवहनच्या जागांवर होर्डिंगला परवानगी देणे, चौक्यांवर जाहिरातींचे हक्क देणे, अत्याधुनिक पद्धतीचे निवारे विकसित करणे, परिवहनच्या जागांवर एटीएम सेंटरची उभारणी करणे, बस आगारांमध्ये सौरउर्जा प्रकल्प राबविणे, बसमध्ये एलईडी स्क्रि न लावून जाहिरात प्रसिद्ध करणे, १३० सीएनजी, ५० मिडी आणि ५० तेजस्विनी बसेसचे सुधारित वेळापत्रक तयार करून नवीन वाहतूक मार्गांवर फेºया वाढवून वेळेत बस उपलब्ध करून परिवहनचेही उत्पन्न वाढविण्यावर भर राहणार आहे.मिडी ऐवजी घेणार मिनी पोस्ट बसबेस्टच्या धर्तीवर मिनी पोस्ट बस खरेदी करणे असे उत्पन्न वाढीचे मार्ग सुचविले आहेत. अर्थसंकल्पात ५० मिडी बस खरेदीची योजना आहे. त्याऐवजी शंभर मिनी पोस्ट खरेदीचा विचार आहे. भविष्यात शहरामध्ये मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर बसऐवजी मेट्रोच्या प्रवाशांची संख्या वाढेल. ही शक्यता गृहित धरून टिएमटीला अंतर्गत मार्गांवर प्रवासी वाहतूक करावी लागेल. त्याअनुषंगाने परिवहन प्रशासनाने मिनी पोस्ट बस खरेदीवर भर दिला आहे.