TMT's Tejaswini will get 4 contract women carriers | टीएमटीच्या तेजस्विनीला मिळणार १२५ कंत्राटी महिला वाहक

टीएमटीच्या तेजस्विनीला मिळणार १२५ कंत्राटी महिला वाहक

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ताफ्यात खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमध्ये वाहक (कंडक्टर) मात्र पुरुषच होते. त्यावर महिला प्रवाशांची नाराजी होती. त्यासाठी आगामी आर्थिक वर्षामध्ये १२५ कंत्राटी महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तीन कोटी २२ लक्ष रकमेची तरतूद केली आहे.

ठाणे परिवहन उपक्र माच्या वागळे आगारामधील कै. मिनाताई ठाकरे सभागृहामध्ये मंगळवारी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेमध्ये परिवहनचे व्यवस्थापक संदिप माळवी यांनी प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांच्याकडे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ४३८ कोटी ८६लाख रु पयांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये वातानुकुलित १०० इलेक्ट्रिक बस, उर्वरित २० पैकी दहा तेजस्विनी परिवहनच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. त्यात १२५ कंत्राटी पद्धतीने महिला वाहकांची नेमणूक केली जाणार आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे महिलांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवाय, ई-तिकीटसाठी ईटीआयएम मशीन, नादुरु स्त १०३ सीएनजी बसगाड्यांची दुरु स्ती करणे, नवीन ५० मिडी बसऐवजी त्याच खर्चातून शंभर मिनीपोस्ट बस घेण्याची योजनाही आहे. दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलत, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतअशी अर्थसंकल्पाची वैशिष्टये आहेत.
बस निवाऱ्यांवर १०६ एलईडी टीव्ही बसवून त्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्याचे हक्क देणे, परिवहनच्या जागांवर होर्डिंगला परवानगी देणे, चौक्यांवर जाहिरातींचे हक्क देणे, अत्याधुनिक पद्धतीचे निवारे विकसित करणे, परिवहनच्या जागांवर एटीएम सेंटरची उभारणी करणे, बस आगारांमध्ये सौरउर्जा प्रकल्प राबविणे, बसमध्ये एलईडी स्क्रि न लावून जाहिरात प्रसिद्ध करणे, १३० सीएनजी, ५० मिडी आणि ५० तेजस्विनी बसेसचे सुधारित वेळापत्रक तयार करून नवीन वाहतूक मार्गांवर फेºया वाढवून वेळेत बस उपलब्ध करून परिवहनचेही उत्पन्न वाढविण्यावर भर राहणार आहे.

मिडी ऐवजी घेणार मिनी पोस्ट बस

बेस्टच्या धर्तीवर मिनी पोस्ट बस खरेदी करणे असे उत्पन्न वाढीचे मार्ग सुचविले आहेत. अर्थसंकल्पात ५० मिडी बस खरेदीची योजना आहे. त्याऐवजी शंभर मिनी पोस्ट खरेदीचा विचार आहे. भविष्यात शहरामध्ये मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर बसऐवजी मेट्रोच्या प्रवाशांची संख्या वाढेल. ही शक्यता गृहित धरून टिएमटीला अंतर्गत मार्गांवर प्रवासी वाहतूक करावी लागेल. त्याअनुषंगाने परिवहन प्रशासनाने मिनी पोस्ट बस खरेदीवर भर दिला आहे.

Web Title: TMT's Tejaswini will get 4 contract women carriers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.