शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

टीएमटीचे जीपीएस केंद्र, आयटीएस प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:29 IST

अद्यावत तंत्रज्ञानामुळे प्रवशांना बस कुठे आहे, ती किती वेळांमध्ये स्टॉप येईल, बसमध्ये किती प्रवासी आहेत, बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे का, याची इत्थंभूत माहितीह स्टॉपवर लावलेल्या स्क्रिनच्या माध्यमातून मोबाइल ॲपद्वारे पोहोचणार होती.

ठाणे : एकीकडे महापालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ठाण्यातील पोखरण २ येथील कोकणीपाड्यातील परिवहन सेवेचे जीपीएस केंद्रासह आयटीएस प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून केवळ कागदावरच आहे. तो रखडल्याने प्रवाशांसाठी बसच्या गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अद्यावत तंत्रज्ञानामुळे प्रवशांना बस कुठे आहे, ती किती वेळांमध्ये स्टॉप येईल, बसमध्ये किती प्रवासी आहेत, बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे का, याची इत्थंभूत माहितीह स्टॉपवर लावलेल्या स्क्रिनच्या माध्यमातून मोबाइल ॲपद्वारे पोहोचणार होती. पण प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.महापालिकेने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ठाण्यात इंटेलिजनट ट्रान्सपोर्ट सिस्टिम (आयटीएस) प्रणालीच्या माध्यमातून पोखरण रोड येथील नीलकंठ या ठिकाणी जीपीएस सेवा केंद्र बांधले आहे; पण गेल्या कित्येक वर्षांपासून ते बंद स्थितीत आहे. शहरातील १०० मार्गांवर सद्यस्थितीमध्ये ३७० बस सेवा कार्यरत आहे. तर आयटीएस प्राणालीच्या माध्यमातून या सर्व बस या जीपीएस सेवेला जोडल्या जाणार होत्या, जेणेकरून लोकांना कुठली बस केव्हा येणार आहे. तसेच बसचे भाडे किती व बसमध्ये किती सीट उपलब्ध आहे, याची माहिती ‘व्हेर इज माय टीएमटी’ बस या ॲपद्वारे घेता येणे शक्य होते. मात्र, २०१७ ते २०२१ या कालावधीत हे ॲप बहुतेक वेळ बंद स्थितीतच होते. महानगरपालिकेने या कामाचा ठेका केपीएमजी ॲडव्हटाइज सर्व्हिसेसे या कंपनीला दिला होता. या कंपनीने गेल्या ४ वर्षांत ठोस असे कुठले ही काम न केल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे १२ वाजलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक बस थांब्यावर टीव्ही बसवण्यात येणार होते. पण गेल्या वर्षभरात ते बसवण्याचे काम अजून रखडलेले आहे. या टीव्हीच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करायचा आणि यामध्ये क्युआर कोड यामध्ये असणार होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१७ साली सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. पण हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका