टीएमटी आता भिवंडीत धावणार
By Admin | Updated: May 3, 2017 05:33 IST2017-05-03T05:33:16+5:302017-05-03T05:33:16+5:30
ठाणे महानगरपालिकेची नारपोलीपर्यंत येणारी टीएमटी बस शहरातील शिवाजी चौकापर्यंत यावी, अशी स्थानिक प्रवाशांची

टीएमटी आता भिवंडीत धावणार
भिवंडी : ठाणे महानगरपालिकेची नारपोलीपर्यंत येणारी टीएमटी बस शहरातील शिवाजी चौकापर्यंत यावी, अशी स्थानिक प्रवाशांची मागणी होती. ती पूर्ण करत दोन दिवसांपासून ही बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद आहे.
ही बस शिवाजी चौकमार्गे वंजारपाटीनाका, एसटी बसस्थानक, कल्याणनाकामार्गे रांजणोली चौक, माजिवडा ते तीनहातनाका अशी जाणार आहे. शहरातील कापड व्यापारी दररोज मुंबईतील तांबाकाटा येथे खरेदीविक्रीच्या निमित्ताने जात असतात. यासाठी खाजगी प्रवासी जीपचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, या जीपचालकांकडून लूट होत असल्याने भिवंडी रोड रेल्वे स्टेशनपासून मुंबईस जाणाऱ्या लोकलची सोय करण्याची मागणी होत होती. दिवा-वसई रेल्वेच्या फेऱ्यादेखील अपेक्षेनुसार वाढल्या नाहीत. मात्र, आता शिवाजी चौकात सुरू झालेली बस मुलुंड आणि ठाणे येथील प्रवाशांसोबतच तांबाकाटा येथे नियमित जाणाऱ्या कापड व्यापाऱ्यांना सोयीची ठरणार आहे. (प्रतिनिधी)