शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

कोणतीही भाडेवाढ न करता चकाचक प्रवासाची टीएमटीची हमी,३५२.८१ कोटींचे मूळ अंदाजपत्रक सादर, इतर उत्पन्नस्त्रोतांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 5:19 PM

कोणत्याही स्वरुपाची भाडेवाढ न करता परिवहन प्रशासनाने इतर उत्पन्न स्त्रोतांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविणाºया भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०१८-१९ चे ३५२.८१ कोटींचे मुळ अंदाजपत्रक परिवहन प्रशासनाने परिवहन समितीला सादर केले. यामध्ये प्रवाशांना चकाचक आणि हायटेक प्रवासाची हमी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहिलांच्या सुरक्षिततेवर दिला जाणार भरपालिकेकडून २२७.७३ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा

ठाणे : भविष्यात ठाणे महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहण्याऐवजी परिवहन उपक्रम सक्षम करण्याच्या दृष्टीकोणातून आणि ठाणेकरांना चांगली सेवा देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठाणे परिवहन सेवा अर्थात टीएमटीने गुरुवारी २०१७-१८ चा सुधारीत आणि २०१८-१९ चा ३५२ कोटी ८१ लाखांचे मूळ अंदाजपत्रक परिवहन समितीला सादर केले. यामध्ये उत्पन्न वाढविण्यासाठी बसथांब्यांवर एलईडी टीव्ही लावून जाहिरात हक्क देणे, परिवहन सेवेच्या जागांवर होर्डिंग्जला परवानगी, चौक्यांवर जाहिरात हक्क देणे, एटीएम सेंटर सुरू करणे, डेपोत सौर उर्जा प्रकल्प राबवून वीजेची बचत करणे, बसमध्ये एलईडी लावून व बसवर जाहिराती प्रसिद्ध करणे अशा नव्या योजनांच्या माध्यमातून तब्बल १५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. याशिवाय ठाणेकर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही बसवून पॅनिक बटन लावणे, वायफाय अंतर्गत मनोरंजाची सेवा, अत्याधुनिक पद्धतीचे बस निवारे उभारणे आणि बंद असलेल्या तब्बल १०० बस रस्त्यावर पुन्हा नव्याने उतरविणे आदी काही प्रवाशी हिताचेदेखील निर्णय या अंदाजपत्रकात घेण्यात आले आहेत. त्यामुळे परिवहनच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता उपलब्ध स्त्रोतांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीवर भर देतांनाच प्रवाशांनादेखील चांगली सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या योजनांवर भर देतांनाच पालिकेकडून २२७.७३ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.                   परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी गुरुवारी परिवहन समिती सभापती अनिल भोर यांना हे अंदाजपत्रक सादर केले. ठाणे परिवहन सेवेचे २०१७ -१८ चे २२८.०८ कोटींचे तर २०१८-१९ चे मूळ अंदाजपत्रक ३५२. ८१ कोटींचे तयार करण्यात आले आहे. टीएमटीच्या ताफ्यात २७७ पैकी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रतिदिनी सुमारे १६५ बस संचालनास उपलब्ध होणार आहेत. तर जीसीसी कंत्राटमार्फत १९० बस उपलब्ध आहेत. त्यानुसार उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असणाºया प्रवाशी भाड्यापोटी १३९ कोटी २२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. यामध्ये साध्या प्रवाशी भाड्यापोटी ४१ कोटी ८८ लाख रुपये, एसी बसकडून ७७ लाख, व्हॉल्व्हो बसचे १८ कोटी ६३ लाख, तर जेएनएनआरयूएम योजनेमधून दाखल झालेल्या आणि होणाºया बसकडून ५३ कोटी ५२ लाख असे एकूण १३९ कोटी २२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. तसेच बसवरील जाहिरात भाड्यापोटी, विद्यार्थी पासेसपोटी, निरुपयोगी वाहन, वस्तू विक्रीपोटी, पोलीस खात्याकडून प्रलंबित रकमेपोटी असे एकूण १४ कोटी ११ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.उत्पन्नांच्या इतर स्त्रोतांवर प्रथमच भर...यापूर्वी केवळ पालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहणाºया ठाणे परिवहन सेवेने यंदा मात्र उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांवरदेखील भर दिला आहे. त्यानुसार शहरातील पहिल्या टप्यात ५० बसथांबे अत्याधुनिक स्वरुपाचे तयार करण्यात येणार असून त्याठिकाणी टॉयलेट, वायफाय आदींसह इतर सुविधा उपलब्ध करून देतांनाच एलईडीच्या माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय प्रत्येक बसमध्ये एलईडी टीव्ही बसवून त्यावरदेखील जाहिरात प्रसारणाचे अधिकार दिले जाणार आहेत. परिवहनच्या चौक्यांवरदेखील जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्नावर भर, आगारांमध्ये सौर उर्जेचा वापर करून विजेची बचत करण्यावर भर, परिवहन सेवेच्या जागांवर होर्डिंग्जद्वारे जाहिरात, परिवहन सेवेच्या जागांमध्ये एटीएम सेंटर सुरू करुन उत्पन्नाचे नवे स्त्रोत विकसित करणे तसेच परिवहनच्या बंद असलेल्या १०० बस दुरुस्त करून त्या रस्त्यावर उतरवून त्या माध्यमातून वार्षिक १५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.* महिल सुरक्षिता, वायफायची सुविधानिभर्यासारखी घटना ठाण्यात घडू नये यासाठी परिवहनच्या सर्वच बसमध्ये येत्या काळात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शिवाय एखादी महिला बसमधून प्रवास करीत असतांना तिची छेडछाड जरी काढली गेली तर प्रत्येक बसमध्ये पॅनिक बटनची व्यवस्था करण्यात येणार असून ते बटन दाबल्यानंतर तत्काळ महिलांच्या सुरक्षितेसाठी मदत पुरविली जाणार आहे. याशिवाय एसटीमध्ये असलेल्या वायफायच्या धर्तीवर परिवहनच्या प्रत्येक बसमध्ये प्रवाशांचा विरंगुळा व्हावा हा उद्देश ठेवून शुगर बॉक्स बसविले जाणार असून त्यातून वायफायच्या माध्यमातून प्रवाशांना मनोरंजानचे कार्यक्रम मोबाईलवर मोफत पाहता येणार आहेत.*अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्टये1 वातानुकुलित १०० इलेक्ट्रिक बसेसठाणे महापालिका पीपीपीच्या माध्यमातून १०० इलेक्ट्रिक एसी बस १० वर्षे संचलनासाठी घेणार आहे. त्यातून परिवहनला एका बसमागे महिनाकाठी १० हजारांचे उत्पन्न मिळणार आहे.2 बायो इथेनॉलवरील १०० बसइलेक्ट्रिक बसेससोबतच ठाणेकरांना जीसीसी तत्वावर १०० वातानुकुलित इथेनॉल इंधनावर धावणाºया बसदेखील उपलब्ध होणार आहेत. मार्चअखेर पहिल्या टप्यात ५ बस दाखल होणार असून वर्ष अखेर ५० बस येणार आहेत.3 तेजस्विनी बसकेवळ महिलांसाठीदेखील ५० तेजस्विनी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यासाठी शासनाकडून ६ कोटींचा निधी पालिकेकडे वर्ग झाला आहे. या बसमध्ये वाहकदेखील महिलाच असणार आहेत.4 ई तिकिटिंगा प्रणाली विकसित करणारमागील कित्येक वर्षे कागदी घोडे नाचविणाºया परिवहनने यंदा पुन्हा ई तिकिटाचे स्वप्न ठाणेकर प्रवाशांना दाखविले आहे. तर परिवहनच्या वेबसाईटच्या माध्यमातून प्रवाशांना बस संदर्भातील तक्रारी थेट करता येणार आहेत.5 ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतठाणे परिवहन सेवेने यंदा प्रथमच मोठा निर्णय घेतला असून महापालिका हद्दीतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अनोखी भेटच देऊ केली आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास भाड्यात५० टक्के सुट देण्याचे प्रस्तावित केली आहे. त्याशिवाय ठाणे महापालिका हददीतील आणि भिवंडी शहरातून महापालिका हद्दीत शिक्षणासाठी येणाºया शालेय विद्यार्थी व इयत्ता १५ वी पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी, आयटीआय. व तंत्र शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना देखील ५० टक्के सवलत देण्याचे प्रस्तावित केले आहे. यातून होणारी तुट ही १ कोटी ५० लाखांची अपेक्षित असून ती महापालिकेकडून अनुदानातून भागविली जाणार आहे.6 अनुदानापोटी २१२ कोटींची मागणीपरिवहन प्रशासाने ३५२ कोटी ८१ लाखांचे मूळ अंदाजपत्रक सादर केले असले तरी त्यात २२७.७३ कोटींचे अनुदान पालिकेकडे मागितले आहे. मागील वर्षी १३६.१३ कोटींचे अनुदान मागितले होते. यंदा त्यात वाढ केली आहे. २२७.७३ कोटींपैकी महसुली खर्चापोटी ९६ कोटी ३४ लाख, भांडवली खर्चासाठी २८ कोटी ४५ लाख, दिव्यांग व इतर संवर्गातील व्यक्तींच्या सवलतीपोटी ११ कोटी २२ लाख तसेच जीसीसीअंतर्गत चालवण्यात येणाºया बस संचालन तुटीपोटी ९१ कोटी ७२ लाख अशी एकूण २२७. ७३ कोटींची मागणी केली आहे.7 दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलतमहापालिका हद्दीत वास्तव्यास असलेल्या दिव्यांग व्यक्तींना परिवहनच्या बसमध्ये आता मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध होणार आहे. त्यांच्या प्रवास खर्चापोटी होणाºया खर्चाची तरतूद महापालिका अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर एडस् बाधीत व्यक्तींनादेखील बस भाड्यात सवलत देण्यात येणार असून त्यापोटी वार्षिक ३० कोटी ८४ लाख ६०० रुपयांचा बोजा परिवहनवर पडणार आहे. ही रक्कम पालिकेकडून अनुदानापोटी घेतली जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त