टीएमटी बस स्टॉपची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:27+5:302021-09-17T04:47:27+5:30
भाजप नगरसेवक संजय वाघुले यांची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नौपाड्यातील ए. के. जोशी शाळेजवळ उभारलेला टीएमटीचा बसस्टॉप ...

टीएमटी बस स्टॉपची
भाजप नगरसेवक संजय वाघुले यांची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नौपाड्यातील ए. के. जोशी शाळेजवळ उभारलेला टीएमटीचा बसस्टॉप चक्क दोन वेळा चोरीला गेला. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा बसस्टॉप बसविण्यात आला. या चोरीमागे बसस्टॉपमागील दुकानदारांचा हात असल्याची शक्यता टीएमटी प्रशासनाने पोलिसांकडे व्यक्त केली आहे.
टीएमटीचा अनेक वर्षांपासून जोशी शाळेजवळ थांबा आहे. सर्वप्रथम २८ जुलैला हा थांबा गायब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत नौपाडा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या गंभीर प्रकाराची दखल वाघुले यांनी घेतली. नगरसेवक अशोक वैती यांनीही तक्रार केली. वाघुले यांनी तातडीने परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांना पत्र पाठवून थांबा पुन्हा बसविण्याची मागणी केली.
या ठिकाणी स्टीलपासून बनविलेला बसथांबा बसविण्यात आला होता. १८ ऑगस्टनंतर तो पुन्हा चोरीला गेला. वाघुले यांच्या पाठपुराव्यानंतर टीएमटीने पुन्हा जोशी शाळेजवळ बसथांबा बसविला.
दुकानांना येतो अडथळा
नौपाड्यातील मोक्याच्या जागी असलेल्या दुकानांना बसस्टॉपचा अडथळा होतो. त्यामुळे बसस्टॉप हटविण्यासाठी काही दुकानदार प्रयत्न करतात. मात्र, जोशी शाळेजवळचे बसस्टॉप दोन वेळा चोरीस जाण्याचा प्रकार धक्कादायक आहे. सीसीटीव्हीद्वारे बसस्टॉप चोरीच्या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी वाघुले यांनी केली आहे.
.............