शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशानंतर ठामपाने हटविला बेकायदा जाहिरात फलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 15:55 IST

सोसायटीने दाखल केली होती अवमान याचिका: जांभळी नाका येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: एकीकडे बेकायदा फलकांवरु न ठाण्यात ठाणे परिवहन सेवेने आक्रमक भूमीका घेतलेली असतानाच न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पालिकेने एका सोसायटीच्या दर्शनी भागात लावलेल्या जाहिरात फलकावर कारवाई केली आहे. जांभळी नाका येथील हा फलक आता हटविण्यात आला आहे.

जांभळी नाका येथे ‘आत्माराम टॉवर’ या इमारतीच्या दर्शनी भागातील पहिल्या मजल्यावर मे. स्पार्क इंटरप्रायझेसचे चैतन्य शिंदे यांनी डिजीटल जाहिरात फलक उभारला होता. हा फलक उभारण्यासाठी या सोसायटीची त्यांनी परवानगी घेतली नव्हती. अनेकदा पालिकेकडे याबाबत तक्रारी करुनही फलक हटविला जात नसल्याने सोसायटीच्या सदस्यांनी अ‍ॅड. व्ही. टी. हुंदलानी आणि अ‍ॅड. निलेश पुंड यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या आधारे २०१९ च्या अखेरीस न्या. इंदलकर यांनी हा जाहिरात फलक हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सोसायटीच्या सदस्यांनी पाठपुरावा करु नही फलक हटविण्यात येत नव्हता. अखेर या खटल्यात काम पाहणारे अ‍ॅड. हुंदलानी आणि अ‍ॅड. पुंड यांनी न्यायालयाचा अवमान होत असल्याची बाब ठामपा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याचीच गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मारु ती खोडके यांच्या आदेशाने पालिका प्रशासनाने हा फलक रविवारी हटविल्याची माहिती आत्माराम टॉवरचे सेक्रेटरी हरमन संजना यांनी दिली. दरम्यान, हा फलक हटविण्यात आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCourtन्यायालय