शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ६८ वर्षांपूर्वी निवडणुकीत ६ सदस्यांची बिनविरोध निवड; वृत्तपत्राचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:59 IST

३० नोव्हेंबर १९५७ या दिवसाचे कात्रण सोशल मीडियावर शेअर केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महापालिकेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. परंतु ६८ वर्षांपूर्वी म्हणजे १९५७ साली झालेल्या ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीत ग. मो. कोळी, य. द. ऊर्फ नानासाहेब सुळे, क. के. पावसकर, ताराबाई वैद्य, आशा दत्तात्रय वाघोलीकर, भि. गं. ओक (वकील) हे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते, अशी माहिती इतिहास अभ्यासक मकरंद जोशी यांनी दिली.  जोशी यांनी १९५७ सालच्या ठाणे नगरपालिकेच्या निवडणूक निकालाचे ‘सन्मित्र’ वृत्तपत्राचे ३० नोव्हेंबर १९५७ या दिवसाचे कात्रण सोशल मीडियावर शेअर केले.

तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शिगेला पोहोचली होती आणि हे सर्व उमेदवार संयुक्त महाराष्ट्र समितीचे होते. त्या काळात ठाणे नगरपालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या ३४ होती. बिनविरोध निवड ही काही नवी बाब नसून तिची परंपरा अनेक दशकांपासून सुरू असल्याचे यातून स्पष्ट होते. अर्थात त्यावेळी झालेल्या बिनविरोध निवडीमागे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे भारावलेले वातावरण होते. यावेळी विजयी झालेले सर्वच उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे असून, त्यांच्यासमोरील काँग्रेस, उद्धवसेना, मनसेच्या उमेदवारांनी पळ काढला. या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या बिनविरोधी निवडीमागे काळेबेरे असल्याचा आरोप राज्य निवडणूक आयोगाकडे केलेला आहे. 

दरम्यान, हे कात्रण व्हायरल झाल्यानंतर ठाणे शहरातील सुज्ञ नागरिकांनी आपली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली. काही ठाणेकरांनी १९५७ मधील बिनविरोध निवड आणि सध्याच्या राजकीय वातावरणातील बिनविरोध निवडीतील परिस्थितीत मोठा फरक असल्याचा आरोप केला. तेव्हाची निवड लोकचळवळीच्या पार्श्वभूमीवर होती, तर आताची निवड वेगळ्या राजकीय संदर्भात होत असल्याचे मत व्यक्त केले. 

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे