शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

टिळक मंदिर सभागृहाचे शंभराव्या वर्षात पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:15 AM

भिवंडी शहरातील टाउन हॉल म्हणून ओळख

भिवंडी : देशातील पहिले टिळक स्मारक म्हणून ओळख असलेल्या शहरातील टिळक मंदिर सभागृह या ऐतिहासिक वास्तूला नुकतीच ९९ वर्षे पूर्ण झाली. अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेल्या या वास्तूचे यंदाचे शताब्दी वर्ष असून भिवंडी शहराचा टाउन हॉल म्हणून या सभागृहाची ओळख बनल्याचे वाचनमंदिर कार्यकारिणी सदस्य यशवंत कुंटे यांनी सांगितले.महादेव कृष्ण जोगळेकर यांनी १९१८ मध्ये टिळक मंदिराची वास्तू उभारण्यास प्रारंभ केला. जुलै १९२० मध्ये ही वास्तू बांधून पूर्ण झाली. सुरुवातीला या वास्तूला आपल्या वडिलांचे नाव देण्याचे जोगळेकर यांनी ठरवले होते. त्याचवेळी १ आॅगस्टला लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यांची शोकसभा याच सभागृहात झाली. जोगळेकर यांनी टिळकांवरील प्रेमापोटी अखेर या वास्तूला त्यांचे नाव देऊ न त्यांच्या स्मृती जपल्याची माहितीही कुंटे यांनी दिली. या वास्तूत सुरू केलेले मयूरेश वाचनालय २८ जून १९२८ रोजी विश्वस्त मंडळ निर्माण करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याचे १४ आॅक्टोबर १९३३ रोजी वाचनमंदिरात विलीनीकरण झाले. पुढे त्याचे स्थलांतर टिळक मंदिर सभागृहात होऊ न तेव्हापासून या सभागृहाची देखभाल-दुरुस्ती वाचनमंदिरातर्फे केली जात आहे. टिळक मंदिराच्या भिंतींवर चितारलेल्या राष्ट्रपुरु षांच्या चित्रांनी या केंद्राची देशाच्या गौरवशाली इतिहासाशी जोडली गेलेली नाळ स्पष्टपणे दिसत असल्याचे ते म्हणाले.वाचनमंदिरातर्फे झालेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पु.भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, सानेगुरु जी, वसंत बापट, शं.ना. नवरे, विद्याधर गोखले, कुसुमाग्रज आदी साहित्यिकांचा पदस्पर्श झाला आहे.हिराबाई बडोदेकर, राम मराठे, वसंतराव देशपांडे, रामदास कामत यांच्या गायनाचे कार्यक्रमही येथे झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे, राम कापसे, ग.प्र. प्रधान यासारख्या राजकीय नेत्यांनी त्यांचे विचारधन या सभागृहात मुक्तपणे खुले केले.विज्ञान, इतिहास, समाजकारण, राजकारण आदी विषय याच सभागृहात जाणत्या श्रोत्यांसमोर तपशीलवार मांडल्याचे कुंटे यांनी सांगितले.

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक