प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 02:38 AM2020-11-25T02:38:54+5:302020-11-25T02:39:02+5:30

उल्हासनगरमधील घटना : मनसे पदाधिकाऱ्याचे कृत्य 

Throwing stones at the governor's car | प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक

प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक

Next

उल्हासनगर : प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडफेक केली. या हल्ल्याचा शहरातून निषेध व्यक्त हाेत असून प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मध्यवर्ती पाेलिसांनी त्यांना अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डी. टी. टेळे यांनी दिली.

सरकारी आरक्षित भूखंडावर बांधकाम होत असल्याच्या तक्रारींची दखल न घेतल्याने ही कृती केल्याची कबुली देशमुख यांनी दिली. तर देशमुख कोरोना काळात भेटले नसून त्यांच्या तक्रारी प्रलंबित नसल्याचे गिरासे यांनी पत्रकारांना सांगितले. उल्हासनगर प्रांत कार्यालय प्रांगणात उभ्या असलेल्या प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी हा हल्ला केला.  दगड लागून गाडीची काच 
फुटली आहे. देशमुख यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून राज्य शासनाच्या आरक्षित भूखंडावर शासनाचा नामफलक लावूनही बेकायदा बांधकामे सुरू आहेत, अशी तक्रार प्रांत कार्यालयाकडे केली. 
मात्र, त्याकडे प्रांताधिकारी कार्यालयाने दुर्लक्ष करून मला कार्यालयात येण्यास मज्जाव केला, असे म्हटले आहे.

‘पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेतील ’
n मंगळवारी दाखल केलेल्या तक्रारीबाबत विचारणा करण्यासाठी प्रांत कार्यालयात गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या निषेधार्थ प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगड भिरकावल्याची कबुली योगीराज देशमुख यांनी दिली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांताधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेतील, असे सांगितले.

Web Title: Throwing stones at the governor's car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.