उल्हासनगरातही रंगला दहीहंडीचा थरार, मानाची जय भवानी मित्र मंडळाची दहीहंडी उशिरा फुटणार

By सदानंद नाईक | Updated: September 7, 2023 19:15 IST2023-09-07T19:15:20+5:302023-09-07T19:15:30+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भेट दिल्यानंतर दहीहंडी रात्री उशिरा फोडण्यात येणार आहे.

Thrill of Dahi Handi in Ulhasnagar, Dahi Handi of Jai Bhavani Mitra Mandal in Netaji Chowk will break late | उल्हासनगरातही रंगला दहीहंडीचा थरार, मानाची जय भवानी मित्र मंडळाची दहीहंडी उशिरा फुटणार

उल्हासनगरातही रंगला दहीहंडीचा थरार, मानाची जय भवानी मित्र मंडळाची दहीहंडी उशिरा फुटणार

उल्हासनगर : कॅम्प नं-४, नेताजी चौकातील जय भवानी मित्र मंडळाची दहीहंडी मानाची मानली जाते. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाने एकच गर्दी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भेट दिल्यानंतर दहीहंडी रात्री उशिरा फोडण्यात येणार आहे.

 शिवसेना शिंदे गटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांच्या संकल्पनेतून जय भवानी मित्र मंडळाची दहीहंडी ही शहरातील मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री माधुरी पवार यांच्या लावणीचा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले असून अरुण अशान यांनी दहीहंडी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे हजेरी लावणार आहे. दहीहंडी ठिकाणी प्रचंड गर्दी असून पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. कॅम्प नं-१ येथील शिवनगर दहीहंडी, कॅम्प नं-५, गायकवाड पाडा, कॅम्प नं-४ येथील लालचक्की येथील मनसे दहीहंडी व देखावा सर्वांचे आकर्षण ठरले आहेत. 

शहरातील मानाच्या दहीहंडीसह लहान मोठ्या दहीहंडी सायंकाळी ५ पूर्वीच गोविंदा पथकाने फोडल्या असून आता मानाच्या दहीहंड्या बाकी आहे. शहरात मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने, गोविंदा पथकाची दमछाक झाली होती. संततधार पावसातही गोविंदा पथक व नागरिक उत्साहाने घरा बाहेर पडल्याचे चित्र होते. तर प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने, कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. तसेच कुठेही गोविंदा थर लावतांना जखमी झाला नाही.

Web Title: Thrill of Dahi Handi in Ulhasnagar, Dahi Handi of Jai Bhavani Mitra Mandal in Netaji Chowk will break late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.