शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आरोग्यसेवेचे वाजले उल्हासनगरमध्ये तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 03:24 IST

शहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते.

- सदानंद नाईकशहराचे आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सृदृढ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते. मात्र, उल्हासनगर पालिकेला याचा विसर पडलेला आहे. केंद्रातील भाजपा सरकार आरोग्यासाठी विविध योजना राबवत आहे. मात्र, उल्हासनगर पालिकेत सत्तेत असलेली भाजपा आरोग्याच्या दृष्टीने कुठलीच पावले उचलताना दिसत नाही. हाच का पारदर्शक कारभार, असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहे.औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगरमधील आरोग्यसेवा कागदावरच असल्याने शहरच व्हेंटिलेटरवर आहे. नऊ लाख लोकसंख्येसाठी पालिकेचे एकही मोठे रुग्णालय नसून आरोग्याची सर्व मदार आरोग्य केंद्रावर आहे. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र बंद असून इतरांची दुरवस्था झाली आहे. तेथील चित्र पाहिले तर ही आरोग्य केंदे्र नसून कचराकुंडी वाटावी इतकी तिथे घाण, दुर्गंधी पसरलेली आहे.महापालिकेने अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेले रूग्णालय उभारण्यासाठी महासभेत अनेकदा प्रस्ताव मंजूर केले. मात्र, रुग्णालयासाठी मंजूर केलेली जागा कालांतराने भूमाफियांनी घशात घातली. सत्ताधाºयांसह विरोधी पक्ष याविरोधात आवाज उठवत नसल्याने रुग्णालय उभे राहू शकले नाही. यातूनच सामान्यांबद्दल नेते, प्रशासन यांना काहीही वाटत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारच्या दबावापोटी लोकसंंख्येच्या प्रमाणात महापालिका आरोग्य विभागाने सहा ठिकाणी आरोग्य केंदे्र सुरू केली, तर चार ठिकाणी प्रस्तावित आरोग्य केंदे्र असून काही ठिकाणी केंद्रांच्या इमारतींचे काम सुरू आहे. आरोग्य केंद्रात नागरिकांवर प्राथमिक उपचार केले जातात. सहापैकी दोन आरोग्य केंदे्र तर खंडहर बनली असूनही ते कागदावर सुरू असल्याचे दाखवले जात आहे. राज्य सरकारच्या मध्यवर्ती रुग्णालयामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत आहेत, इतकेच काय ते समाधान. पावसाळ्यात साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असते. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचारी, डॉक्टर व मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. महापालिकेकडे फक्त तीन डॉक्टर, तीन परिचारिका व इतर कर्मचारी स्थायी स्वरूपाचे असून इतर कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका ठोस वेतनावर घेतले आहेत. आरोग्य, औषधखरेदी व आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी सुविधा पुरवण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाचे आहे. मात्र, विभागाचे बजेट जेमतेम एक ते दीड कोटीचे आहे. एवढ्या कमी बजेटमध्ये शहरातील नऊ लाख लोकसंख्येला कशी आरोग्य सुविधा पुरविणार, हा खरा प्रश्न आहे. पावसाळ्यात आपत्कालीन कक्षाची स्थापना महापालिकेला मध्यवर्ती रुग्णालयात करावी लागते. तसेच इतर सुविधांसाठी मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते, अशी दयनीय अवस्था पालिकेच्या आरोग्य विभागाची झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर