शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या तिघांना उल्हासनगरात बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 19:20 IST

बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 उल्हासनगर - बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बिबटयाच्या कातडीची किंमत १० लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.उल्हासनगर कॅम्प नं-१ संच्युरी रेयॉन कंपणीच्या विश्रामगृहाकडील मुरबाड रस्त्यावर बिबटयाची कातडी विकण्यासाठी त्रिकूट येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला खब-या कडून मिळाली. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान सेच्युरी कंपणी मुरबाड रस्त्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला. गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान टाटा नॅनो गाडीतून तिघे जण उतरून, रस्त्यांनी जात होते. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्यावर, त्यांना अडवून अंगझडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडील प्लॉस्टिकच्या बॅगेत बिबटयांची सुकविलेली कातडी आढळून आली.उल्हासनगर गुन्हे शाखेचे प्रमुख मनोहर पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक उरद्दीन शेख, युवराज मागुडे, पोलिस उपनिरिक्षक गणेश तोरमल, रामसिंग चव्हाण, सुरेश पवार आदीच्या पथकांने प्रमोद पवार, अनिल खैरनार व राकेश निकम  यांना अटक करून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अटक केलेले त्रिकुट मुळ नाशिक जिल्हातील राहणारे असून, कोण्या गँगशी अथवा वन्य प्राणी हत्या करणारी टोळीसी संबधीत आहे का?. आदी तपास उल्हासनगर पोलिस करणार आहे. त्रिकुटाला न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच  पोलिसांनी नाटा नॅनो गाडीसह मोबाईल व १० लाख किमतीची बिबटयाची सुकवलेली कातडी जप्त केली. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याulhasnagarउल्हासनगरCrimeगुन्हा