शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

कोरोनाला वाकुल्या दाखवून वर्षभरात झाले तीन हजार ८३७ विवाह; ठाण्यात दिवाळीनंतर विवाहांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 22:59 IST

ठाण्यात दिवाळीनंतर विवाहांची संख्या वाढली

स्नेहा पावसकर  ठाणे : गेल्या वर्षी कोरोना आला आणि आपण सगळेच लॉकडाऊनमुुळे घरात बसलो. पण काही महिने जसे हळूहळू अनलॉक होऊ लागले तसे पुन्हा एकदा कार्यालये, व्यवहार, उत्सव, सोहळ्यांना थोडक्या माणसांमध्ये करण्याची परवानगी मिळू लागली. कोरोनाची धास्ती तर गेले वर्षभर आपण घेऊन फिरतोय. पण त्यातही त्याच कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या मार्चपासून ते या मार्चपर्यंत ठाणे जिल्ह्यात सुमारे ३,८३७ जोडप्यांनी रजिस्टर्ड मॅरेज केले.

कोरोना महामारीला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. मध्यंतरीच्या काळात सण, उत्सव, घरगुती सोहळे, विवाह यांना मोजक्या माणसात करण्याची मुभा दिली होती. तसे नियम घातले होते. काही ठिकाणी हे नियम मोडले गेले खरे; पण ठाणे जिल्ह्यात मात्र गेल्या वर्षभरात नियम पाळत लग्नसोहळे झाले. 

विशेष म्हणजे वारेमाप खर्च टाळण्याच्या दृष्टीने आणि कमी माणसांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने अनेकांनी नोंदणी करून रजिस्टर्ड मॅरेज करण्यावर भर दिलेला पाहायला मिळाला. २०२० मध्ये एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊन होता. परिणामी कोणीही घराबाहेर पडले नाही किंवा लग्नाच्या दृष्टीने नियोजन केले नाही. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये एकही विवाह ठाण्यात झाला  नाही. तर तुलसी विवाहानंतर मुहूर्त पाहून अनेकांनी लग्नाचा बार उडवला. इतकेच काय तर मुहूर्त नसतानाही गेल्यावर्षी अनेकांनी लग्नसोहळे उरकले.

अनेकांचे विवाह लांबणीवर 

गेल्यावर्षी अनलॉकनंतर काही प्रमाणात विवाह सोहळे झाले. मात्र ते अगदी नगण्य होते. अन्यथा आमच्याकडे एकाच दिवशी खूप विवाह होतात. परंतु त्यांची संख्या मे ते ऑक्टोबरपर्यंत कमी होती. मात्र तुलसी विवाह झाल्यावर पुन्हा विवाहसंख्या वाढली. त्याचदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भावही ओसरला होता. मात्र आता पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक विवाहइच्छुकांनी आपले मुहूर्त पुढे ढकलले आहेत, अशी माहिती एका मंगल कार्यालय चालकाच्या कर्मचाऱ्याने दिली.

अनेक वस्तू मनासारख्या मिळाल्याच नाहीत

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन झाले. पण त्यातही केवळ एप्रिलचा महिना सोडला तर अनेकांनी उर्वरित महिन्यांत अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसात विवाह सोहळे केले. त्यावेळी विवाहासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूही लॉकडाऊनमुळे काहींना खरेदी करता आल्या नव्हत्या. मात्र जे उपलब्ध आहे त्यात तडजोड करून अनेक जण जोडपी विवाहासाठी पोहोचली होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे