बोरीवलीत मगरींची तस्करी करणारे तिघे अटके त; वनविभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:50 PM2019-09-17T23:50:08+5:302019-09-17T23:50:14+5:30

दुर्मिळ वन्य प्राण्याची तस्करी करणा-या बसचालक मोहंमद अब्दुल रहीम हाफिज (३३) याच्यासह खुददुस लातफ बैग (३८) आणि शिवाजी बलाया (२८) या तिघांना ठाणे वनविभागाने मुंबईतील बोरीवली भागातून सोमवारी अटक केली.

Three suspects arrested for smuggling in Borivali; Forest department action | बोरीवलीत मगरींची तस्करी करणारे तिघे अटके त; वनविभागाची कारवाई

बोरीवलीत मगरींची तस्करी करणारे तिघे अटके त; वनविभागाची कारवाई

Next

ठाणे : खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसच्या डिकीतून चक्क मगर या दुर्मिळ वन्य प्राण्याची तस्करी करणा-या बसचालक मोहंमद अब्दुल रहीम हाफिज (३३) याच्यासह खुददुस लातफ बैग (३८) आणि शिवाजी बलाया (२८) या तिघांना ठाणे वनविभागाने मुंबईतील बोरीवली भागातून सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन जिवंत मगरींची सुखरुपरित्या सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बोरीवली येथे जाणाºया एका खासगी प्रवासी बसमधून मगरींच्या पिलांची तस्करी होत असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्या आधारे १६ सप्टेंबर रोजी बोरीवली येथे एका संशयित बसची ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक गिरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल पवार, परदेशी आणि मोरे आदींच्या पथकाने तपासणी केली. तेंव्हा बसच्या सामान ठेवण्याच्या डिकीत एका बॉक्समध्ये डांबून ठेवलेल्या दोन जिवंत मगरी आढळून आल्या. याप्रकरणी बसचालक हाफिज याच्यासह तिघांना वनविभागाने अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मगरींची तस्करी करीत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यांच्या ताब्यातून दोन मगरींची सुटका केली आहे. त्यांनी त्या कोणाकडून आणल्या त्याची ते कोणाला विक्री करणार होते, याची चौकशी सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. ठाण्याचे वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Three suspects arrested for smuggling in Borivali; Forest department action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.