लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोबाइलची चोरी करणा-या अन्वर खान (२१) शाहीद अन्सारी (२०) आणि शाहीद अन्सारी (२०) या तिघांना कापूरबावडी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाइल हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. पवार आणि पोलीस हवालदार डी. बी. खोडे यांचे पथक २९ आॅक्टोबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आर मॉल सर्कलजवळ गस्त घालीत होते. त्यावेळी अन्वर खान हा संशयास्पदरित्या फिरतांना या पथकाला मिळाला. त्याच्या अंगझडतीमध्ये मिळालेल्या मोबाइलबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा मोबाईल २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याने चोरल्याची कबूली दिली. त्याच्याच चौकशीमध्ये त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २५ हजारांचे सात मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
मोबाइलची चोरी करणा-या तिघांना ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 22:25 IST
गस्तीच्या दरम्यान कापूरबावडी पोलिसांनी चाणाक्षपणे केलेल्या चौकशीमध्ये एक मोबाइल चोरटा हाती लागला. त्याच्याच चौकशीमध्ये तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीतील सात मोबाइलही हस्तगत करण्यात आले आहेत.
मोबाइलची चोरी करणा-या तिघांना ठाण्यातून अटक
ठळक मुद्देसात मोबाइल हस्तगत कापूरबावडी पोलिसांची कारवाईगस्तीदरम्यान चौकशीमध्ये मिळाला आरोपी