हवेत चाकू फिरवीत तरुणाची माहिलेसह तिघांना मारहाण

By जितेंद्र कालेकर | Updated: July 30, 2024 00:09 IST2024-07-30T00:09:06+5:302024-07-30T00:09:17+5:30

कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा.

Three people including his wife were beaten up by a young man swinging a knife in the air | हवेत चाकू फिरवीत तरुणाची माहिलेसह तिघांना मारहाण

हवेत चाकू फिरवीत तरुणाची माहिलेसह तिघांना मारहाण

जितेंद्र कालेकर ( ठाणे) लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: हवेत चाकू फिरवित सनी तेलोरे (२३, रा. कळवा, ठाणे) या तरुणाने विमल वेल्लरे या महिलेसह रोहित शिंदे आणि राजशेखर वेल्लरे अशा तिघांना मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सुनंदा शिंदे (४४) यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलिसांनी सोमवारी दिली.

कळव्यातील महात्मा ज्योतिबा फुले नगर भागात सनी तेलोरे याने २६ जुलै २०२४ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चाकू घेऊन सुनंदा शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडला. त्यांची बहिण वंदना शिंदे यांच्याही घरात शिरकाव करुन तिच्या घरातील सामानाची तोडफोड केली. तर विमल वेल्लरे या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिचे केस पकडून तिला भिंतीवर आपटले. त्याच परिसरातील राजशेखर आणि रोहित या मुलांनाही घरासमोर जाऊन त्याने मारहाण केली. याच भागातील घरांचे दरवाजे तोडून हवेमध्ये चाकू फिरवून शिवीगाळ करुन सुनंदा शिंदे यांना मारण्याची धमकी देत परिसरात दशहत निर्माण केली. या सर्वच प्रकाराने भेदरलेल्या सुनंदा यांनी यांनी त्याच्याविरुद्ध २६ जुलै २०२४ रोजी कळवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस २०२३) कलम ११८, ११५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three people including his wife were beaten up by a young man swinging a knife in the air

टॅग्स :thaneठाणे