शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणातून तिघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:45 IST

कल्याणमधील घटना : चौकडीविरोधात गुन्हा

डोंबिवली : रिक्षाचा दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांना हॉकीस्टीक व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री गोळवली परिसरात घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात चौकडीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पूर्वेतील गोळवली परिसरातील पांडुरंगवाडी येथे राहणारा अनिकेत सातपुते (१८) याचे मेव्हुणे अश्विन कांबळे यांनी घराजवळ रिक्षा उभी केली होती. त्यावेळी त्यांच्या रिक्षाच्या मागे शेजारी राहणाऱ्या भारत लाला चव्हाण याने त्याची दुचाकी उभी केली. थोड्यावेळाने रिक्षा काढायला गेलेल्या कांबळे यांच्या रिक्षाचा धक्का भारतच्या दुचाकीला लागला. त्यामुळे दुचाकी खाली पडली. यावरून या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास भारत, त्याचा भाऊ अरुण, भारतची मुले अनिल आणि सुनील यांनी कांबळे यांना शिवीगाळ केली. तसेच भारतने हॉकीस्टिकने अनिकेतला मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या अनिकेतचा काका भैय्यासाहेब आणि त्याच्या बहिणीलाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अनिकेतने मानपाडा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारत चव्हाण, अरुण, अनिल आणि सुनील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस