आणखी तिघे परतले घरी
By Admin | Updated: July 27, 2015 01:13 IST2015-07-27T01:13:57+5:302015-07-27T01:13:57+5:30
हरवल्यानंतर बालसुधारगृहात जीवन जगणाऱ्या मुलांना त्यांच्या घरी परत पाठविण्यात आॅपरेशन मुस्कान या विशेष मोहिमेंतर्गत ठाणे

आणखी तिघे परतले घरी
ठाणे : हरवल्यानंतर बालसुधारगृहात जीवन जगणाऱ्या मुलांना त्यांच्या घरी परत पाठविण्यात आॅपरेशन मुस्कान या विशेष मोहिमेंतर्गत ठाणे शहर पोलिसांना यश आले आहे. अशा प्रकारे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत आणखी तिघे घरी परतले असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चार वर्षांपूर्वी कळवा, शांतीनगरमधील सोनू रॉय ही १२ वर्षीय मुलगी हरवली होती. याचदरम्यान, तिला न्यू पनवेल पोलिसांनी भिवंडी बालसुधारगृहात दाखल केल्यावर काही दिवसांनंतर ती ठाण्यातील दिव्यप्रभात आश्रमात वास्तव्यास आली होती.
तिच्या माहितीनुसार पालकांचा शोध घेण्यात आला आहे. तिच्या आईच्या निधनानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर बोईसर येथील उदयन यादव (१०) हा मुलगा दीड वर्षापूर्वी एक्स्प्रेसमधून झारखंडला गेला होता. एक महिन्यापूर्वी तेथील पोलिसांनी भिवंडीत बालसुधारगृहात
दाखल केले होते. याचदरम्यान, त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.