दोन अल्पवयीन मुलींसह तिघे बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:32 AM2019-03-08T05:32:18+5:302019-03-08T05:32:24+5:30

शहरातील कळवा, कासारवडवली आणि कापूरबावडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी बुधवारी नोंदविण्यात आल्या आहेत.

Three missing two minor girls | दोन अल्पवयीन मुलींसह तिघे बेपत्ता

दोन अल्पवयीन मुलींसह तिघे बेपत्ता

Next

ठाणे : शहरातील कळवा, कासारवडवली आणि कापूरबावडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी बुधवारी नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन १६ वर्षीय मुलींसह १३ वर्षीय मुलाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कळव्यात राहणारी १६ वर्षीय मुलगी ५ मार्च रोजी बाथरूमला जाते, असे सांगून घराबाहेर गेली, ती परतलेली नाही. तिला पळवून नेले असावे, असा संशय तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
दुसऱ्या घटनेत घोडबंदर रोड, ओवळा येथे राहणारी १६ वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे ६ मार्च रोजी कामाला गेली होती. तेथे केलेल्या कामाचा पगार मिळाल्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर, ६ मार्च रोजी मानपाडा येथे राहणारा १३ वर्षीय मुलगा घरात कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्यालाही कोणीतरी पळवून नेले असावे, असा संशय त्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.

Web Title: Three missing two minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.