शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेण्डशिप क्लबमध्ये ‘सेक्स’चे आमिष दाखवून सव्वा तीन लाखांची फसवणूक

By जितेंद्र कालेकर | Updated: November 29, 2018 19:35 IST

फ्रेण्डशिप क्लबमध्ये सदस्यत्व घेतल्यास या क्लबमधील उच्चभ्रू महिलांशी सहज मैत्री करुन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवता येतात, असे अमिष दाखवून ठाण्यातील एका जेष्ठ नागरिकाला सव्वा तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. वेगळयाच प्रकारच्या या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावले आहेत.

ठळक मुद्देआंबटशौकिन ज्येष्ठ नागरिकाला गंडानौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारपैसे घेतल्यानंतर सूत्रधार ‘नॉट रिचेबल’

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : फ्रेण्डशिप क्लबमध्ये गुंतवणूक केल्यास उच्चवर्गातील महिलांकडून अनैतिक शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती दिली जाते, असे आमिष दाखवून तीन लाख ३० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल आणि समीर या दोघांविरुद्ध मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या क्लबमध्ये संबंधित तक्रारदाराने गुंतवणूक केल्यानंतर मात्र हा क्लब चालवणारे भामटे आता ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.फ्रेण्डशिप क्लबमध्ये सदस्यत्व घेतल्यास या क्लबमधील उच्चभ्रू महिलांशी सहज मैत्री करता येते. क्लबमार्फत मैत्रीसाठी पुरवण्यात येणाऱ्या महिला क्लबमधील पुरुषांशी अनैतिक शारीरिक संबंध ठेवतात. त्या मोबदल्यात त्यांना प्रत्येक भेटीनंतर ७५ हजार रुपये तसेच अधिक ५० हजार रुपये दिले जातात, असे आमिष नौपाड्यातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फोनद्वारे दाखवण्यात आले होते. पण, क्लबचे सभासद होण्यासाठी रजिस्ट्रेशन शुल्क आणि त्या महिलांसोबत हॉटेलमध्ये जाण्यासाठी लागणारा खर्च यासाठी तीन लाख ३० हजारांची रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. मात्र, ती राहुल आणि समीरनामक व्यक्तींनी स्वीकारल्यानंतर ते दोघेही पसार झाले. त्यांनी अशा कोणत्याही फ्रेण्डशिप क्लबचे सदस्यत्वही त्यांना दिले नाही. त्यानंतर, त्यांना आलेल्या फोनवर त्यांनी वारंवार संपर्क साधला असता, हे फोन बंद आढळले. त्यानंतर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नौपाड्यातील या आंबटशौकिन ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. वेगळ्याच प्रकारे फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी