दानबावमध्ये तीन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST2021-05-29T04:29:14+5:302021-05-29T04:29:14+5:30

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील दानबाव गावात गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी तीन घरे फोडली. त्यामुळे दानबाव गाव ...

Three houses were blown up in Danbaw | दानबावमध्ये तीन घरे फोडली

दानबावमध्ये तीन घरे फोडली

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील दानबाव गावात गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी तीन घरे फोडली. त्यामुळे दानबाव गाव तसेच पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे.

कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. एप्रिलमध्ये रात्रीच्या वेळी नडगाव येथे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर आठवडाभरात पळसोली येथे घरफोडीचा प्रकार घडला होता. तसाच प्रकार गुरुवारी रात्री खडवली-फळेगाव रस्त्यावरील दानबाव गावात घडला आहे. तेथील ग्रामस्थ प्रकाश व्यापारी यांच्या घरातून साडेसात तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. विनायक चौधरी यांच्या घरातील तीन हजार रुपयावर डल्ला मारला. तर, रवींद्र चौधरी यांचे घरही चोरट्यांनी टार्गेट केले. मात्र, तेथे त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. मात्र, चोरट्यांनी त्यांच्या घराची नासधूस केली आहे.

दरम्यान, या घटनांची माहिती मिळताच खडवली पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी ताबंडा यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यासंदर्भात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असून, ते अधिक तपास करीत आहेत.

-------------

Web Title: Three houses were blown up in Danbaw