शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कंपनीच्या साडेतीन लाख ग्राहकांचा डाटा हॅक करून डिलीट करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक   

By धीरज परब | Updated: February 26, 2025 23:38 IST

Mira Road Crime News: एका सॉफ्टवेअर कंपनीच्या साडे तीन लाख ग्राहकांचा डाटा हॅक करून तो डिलीट करणाऱ्या कंपनीच्या उत्तर प्रदेशातील तिघा कर्मचाऱ्यांना मीरारोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे .  

मीरारोड - एका सॉफ्टवेअर कंपनीच्या साडे तीन लाख ग्राहकांचा डाटा हॅक करून तो डिलीट करणाऱ्या कंपनीच्या उत्तर प्रदेशातील तिघा कर्मचाऱ्यांना मीरारोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे.

मीरारोड भागात राहणार राज रामप्रसाद सिंग ( वय ३६ वर्षे ) यांचे पुनॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेड व अॅब्सोल्युट सॉफ्ट सीस्टीम प्रायव्हेट लिमीटेड या कंपन्या आहेत . या कंपनीच्या मालकीचे  ' मॅजिक लॉकर ' नावाचे सॉप्टवेअर आहे . सॉफ्टवेअरचा डाटा हॅक करून तो डिलीट केला प्रकरणी नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक उगले , सहायक निरीक्षक सुधीर थोरात व पराग भाट सह राजेश काळकुंड, प्रमोद केंद्रे, महेश खामगळ, लालाजी लटके, रहमत पठाण तसेच सायबर तज्ञ पुष्कर झांन्टेय, समीर बयाणी यांनी तपास सुरु केला.

तांत्रिक विश्लेषणा वरून पोलीस सदर कंपनीच्या उत्तरप्रदेशातील वाराणसी शाखेतील कर्मचारी मनोजकुमार छोटेलाल मौर्या व  हिमांशू अशोक सिंग यांना अटक केली तर चंद्रेश लालजी भारतीय ह्याला विरार मधून पकडले . त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेले ३ लॅपटॉप व ३ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. सदर डाटा हॅक करून स्वतःची कंपनी काढून सदर ग्राहक हे आपल्या कडे वळवण्याचा आरोपींची डाव आखला होता.

सॉफ्टवेअरच्या मुळ सोर्स कोडमध्ये हेराफेरी करुन व मॅजिक लॉकरच्या सर्वरमध्ये अनाधिकृतपणे अॅक्सेस मिळवून ३.५ लाख पेक्षा अधिक ग्राहकांचा डाटा हॅक करून तो डिलीट केला . त्यामुळे सिंग यांना १ करोड ५१ लाख रुपयांची नुकसान भरपाई ग्राहकांना द्यावी लागली .  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी