तीन कोटींची पाणीपट्टी थकीत

By Admin | Updated: November 9, 2015 02:46 IST2015-11-09T02:46:30+5:302015-11-09T02:46:30+5:30

महाड तालुक्यातील एकूण १९ गावांना व महाड नगर पालिकेला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो.

Three crore water turbines are exhausted | तीन कोटींची पाणीपट्टी थकीत

तीन कोटींची पाणीपट्टी थकीत

बिरवाडी : महाड तालुक्यातील एकूण १९ गावांना व महाड नगर पालिकेला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याचे ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत ३ कोटी ४ लाख ३ हजार ४६ रूपये एवढी पाणीपट्टी निव्वळ रक्कम थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाड औद्योगिक विकास महामंडळाकडून आसनपोई ग्रामपंचायतीची निव्वळ थकीत पाणीपट्टी १५ लाख ९४ हजार ५९२ रूपये, कांबळे १० लाख ८४ हजार ३८५ रूपये, सवाणे (खैरे) १० लाख ४७ हजार ६५ रूपये, सवाणे बौध्दवाडी ३ लाख १३ हजार ७३ रूपये, नडगाव (नांगलवाडी) २ हजार ९५ रूपये, नडगाव बौध्दवाडी ५ हजार ७४८ रूपये, नडगांव अरूण नगर वजा ९ हजार ९५३ रूपये, जिते (टेमघर) २ लाख ७८ हजार ६९० रूपये, काळीज ६ लाख २२ हजार ६३३ रूपये, बिरवाडी ४ लाख ३५२७१ रूपये, खरवली ६ लाख २५ हजार ९९४, धामणे वजा ५० हजार ६७२, आमशेत कोंड वजा १ हजार ४९७, नडगाव काळभैरव वजा ५९०, नडगाव (जवळ पिडीलाईट) वजा ४ हजार ६९६ रूपये, नडगाव सोमजाई मंदिर वजा २७७१ रूपये, आमशेत ९२ हजार ९८१ रूपये, महाड नगर पालिका २ कोटी ४२ लाख ४८ हजार ९७२ रूपये, बिरवाडी कुंभारवाडा ८२ हजार ६५८ रूपये, जिते ३९ हजार ६८ रूपये एकूण ४ कोटी ३ हजार ४६ रूपये एवढी निव्वळ पाणीपट्टी रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत थकीत असल्याची माहिती महाड एमआयडीसी पाणीपट्टी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
या सर्व थकीत पाणीपट्टी दंडनीय रक्कम व विलंब शुल्कासह एकूण ११ कोटी ६४ लाख ५४ हजार ७५९ रूपये एवढी आहे. मात्र निव्वळ रक्कम भरल्यावर दंडाची सर्व रक्कम संबंधित ग्रामपंचायती, नगर पालिका यांना माफ करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सी.एन.पाटील यांनी दिली आहे. ग्रामपंचायतींना सवलती देण्यात येत असल्या तरी पाणीपट्टी वसुली वेळेत होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या थकीत पाणीपट्टीचे प्रमाण वाढत जाते, परिणामी ग्रामपंचायतीला होणारा पाणीपुरवठा खंडित केला जातो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Three crore water turbines are exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.