Three coronary patients rise in Thane in a day: Thane | ठाण्यात एका दिवसात तीन कोरोनाच्या रुग्णांची वाढ कोरोना रुग्णांची संख्या झाली १६, मुंब्य्रात कोरोनाचा शिरकाव

ठाण्यात एका दिवसात तीन कोरोनाच्या रुग्णांची वाढ कोरोना रुग्णांची संख्या झाली १६, मुंब्य्रात कोरोनाचा शिरकाव

ठाणे : कळव्यातील साईबाबा नगर परिसरात अढळलेला ५९ वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली असतांना शुक्रवारी ठाण्यातील विविध भागातील आणखी तीघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक रुग्ण हा मुंब्य्रातील अमृत नगर भागात आढळून आला आहे तर एक रुग्ण ठाण्यातील धोबी आळी भागातील तर तिसरा रुग्ण हा लोढा पॅराडाईज भागात आढळून आला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही १६ झाली आहे. परंतु आता मुंब्य्रात पहिला रुग्ण आढळून आल्याने आता या भागात सर्तकता घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
                  गुरुवारी कळव्यातील एका वृध्दाचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असतांना शुक्रवारी शहरातील लोढा पॅराडाईज, धोबी आळी आणि मुंब्य्रातील अमृत नगर भागातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. धोबी आळी भागातील ५७ वर्षीय व्यक्तीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर लोढा पॅराडाईज येथील रुग्णावर देखील उपचार सुरु आहेत. तर मुंब्य्रातील गजबजलेल्या परिसरात आता कोरोनाने शिरकाव केला असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंब्रा हा अतिशय गजबजलेला परिसर आहे. या भागातील काही नागरीक हे दिल्लीला मरगज येथे गेले होते. परंतु त्यांचे रिपोर्ट हे निगेटीव्ह आले होते. परंतु आता मुंब्य्रातील अमृत नगर भागात राहणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कोरोनाने मुंब्य्रात शिरकाव केला असल्याने येथे आता खरबदारीचे उपाय योजले जात आहेत. नागरीकांना खरबदारीच्या सुचना दिल्या जात आहेत. तसेच संबधींत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचा शोध पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली 

Web Title: Three coronary patients rise in Thane in a day: Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.