भिवंडीमध्ये दोन दिवसांत खुनाच्या तीन घटना
By Admin | Updated: March 22, 2017 01:22 IST2017-03-22T01:22:45+5:302017-03-22T01:22:45+5:30
घरांत कुणीही नसताना चोरीसाठी घुसलेल्या चोराने दिवसाढवळ्या घरातील महिलेचा खून केला.

भिवंडीमध्ये दोन दिवसांत खुनाच्या तीन घटना
भिवंडी : घरांत कुणीही नसताना चोरीसाठी घुसलेल्या चोराने दिवसाढवळ्या घरातील महिलेचा खून केला.
उषा अनंता म्हात्रे (५१)असे मृत महिलेचे नाव असून त्या आपल्या मुलासह कोन गावातील दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. सोमवारी दुपारी त्या घरात एकट्या असताना चोर शिरला. त्याने चोरी करण्यास अडसर ठरलेल्या उषा यांचा खून केला. रात्री प्रवीण घरी परतल्यानंतर आपली आई रक्ताच्या थारोळयात दिसली. या बाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर केलेल्या तपासात चोरीपूर्वी उषा यांचा गळा आवळून खून केल्याचे आढळले. तसेच चोराने ३ लाख रकमेसह १० लाख ८० हजाराचे दागिने व सीसीटीव्हीचे टीव्हीआर मशीन चोरी केल्याचे आढळले. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
पत्नीच्या खूनप्रकरणी अटक
फरशीवर पाय घसरून पडल्याचा बनाव रचून पतीने पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी पतीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिजबन परवीन मजीबूर रेहमान इद्रीसी (२१) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती मजीबूर रेहमान इद्रीसी(२१)याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात तिच्यावर विळ्याने गंभीर दुखापत करून तिचा खून केला. मात्र फरशीवर पडून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. नारपोली पोलीस ठाण्यात मजीबूरविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. (प्रतिनिधी)