शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरफोडया करुन मोबाईल आणि रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 23:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करुन पसार झालेल्या पवन राम (२९, रा. रामनगर, ...

ठळक मुद्देश्रीनगर पोलिसांची कारवाईएक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट परिसरातील दोन दुकानांमध्ये चोरी करुन पसार झालेल्या पवन राम (२९, रा. रामनगर, ठाणे), संदीप अठवाल, (२६, रा. रामनगर) आणि विजय डिंग (२६, रा. भांडूप, मुंबई) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून चोरीतील एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वागळे इस्टेट, सीपी तलाव येथील सुनिल निशाद (२६) यांच्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात २९ जानेवारी २०२१ रोजी रात्री १० ते ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वा. च्या सुमारास अज्ञात चोरटयाने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १७ मोबाईल आणि दोन डिस्प्ले असा एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली होती. तर वागळे इस्टेट, शिवाजीनगर भागातील सचिन सूर्यवंशी यांच्या धन्वंतरी मेडिकल दुकानातूनही २९ जानेवारी रोजी रात्री ते ३० जाानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान चोरटयांनी शटर तोडून दोन हजारांची रोकड लंपास केली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये सीसीटीव्हीतील चित्रण तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पवन याच्यासह तिघांची नावे तपासात समोर आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि सुनिल शिंदे यांच्या पथकाने केलेल्या चौकशीमध्ये या तिघांनाही ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्यांनी या दोन्ही चोऱ्यांची कबूली दिली. त्यांच्याकडून १७ मोबाईल आणि दोन हजारांची रोकड असा एक लाख चार हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्यापैकी विजय डिंग याने भांडूप भागातही चोरी केल्याचे आढळले असून तो तेथील चोरीच्या गुन्हयातही वॉन्टेड आहे. या तिघांनाही ठाणे न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी