मोबाइल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST2021-09-16T04:50:56+5:302021-09-16T04:50:56+5:30

मीरा रोड : घरफोडी-चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे उत्तनच्या एका गुन्ह्यात रविवारी अटक केलेल्या दोन अल्पवयीन ...

Three arrested, including two minors, for stealing a mobile phone | मोबाइल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक

मोबाइल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक

मीरा रोड : घरफोडी-चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे उत्तनच्या एका गुन्ह्यात रविवारी अटक केलेल्या दोन अल्पवयीन मुलांवरून स्पष्ट झाले आहे.

उत्तनच्या करईपाडा येथील मोबाइल दुकानचे पत्रे तोडून आतील ४१ हजार रुपये किमतीचे सात मोबाइल चोरीला गेले होते. उत्तन सागरी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून, पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आढळून आल्यानंतर त्यांची ओळख पटावी, म्हणून पोलिसांना छायाचित्रे शेअर केली होती. त्यातूनच आरोपी हे भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यातील मुख्य आरोपी विकास चोहान (२३) हा असून, अन्य दोघे आरोपी हे १६ वर्षांचे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सर्व सात मोबाइल जप्त केले आहेत. तीन दिवसांत पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.

घरफोडी-चोरीसाठी या दोघा मुलांचा वापर केला जात असे. अंगाने सडपातळ असल्याने ते चिंचोळ्या जागेतूनही सहज शिरायचे. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याची चौकशी पोलीस करत आहेत.

Web Title: Three arrested, including two minors, for stealing a mobile phone