शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; ३७ लाखांचा ७४ किलाे गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:20 IST

ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटची कामगिरी: घराच्या पडवीमध्येही मिळाला गांजा

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गांजाची तस्करी करणाऱ्या फैजल अन्सारी (४४) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. या आराेपींकडून ३७ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा ७४ किलाे ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे.

भिवंडीतील माेमीनबाग दर्गा राेड भागात अन्वर अन्सारी याच्या घराजवळ फैजल हा गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती भिवंडी युनिटचे वरिष्ठ पेालीस निरीक्षक जनार्दन साेनवणे यांना मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे ३ जुलै २०२५ राेजी राेजी उपायुक्त जाधव आणि सहायक पाेलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साेनवणे यांच्यासह सहायक पाेलीस निरीक्षक धनराज केदार, श्रीराज माळी आणि उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून फैजल याच्यासह अब्दुल अन्सारी (२०) आणि अन्वर अन्सारी या तिघांना अटक केली.

फैजल आणि अब्दुल यांच्या अंगझडतीमध्ये तसेच अन्वर याच्या भिवंडीतील माेमीनबाग दर्गा राेड येथील घराच्या पडवीमध्येही असा ७४ किलाे ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी भाेईवाडा पाेलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टाेळीने हा गांजा काेणाकडून आणला? त्यांचे आणखी काेण काेण यात साथीदार आहेत, याचाही तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी