शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे आझम खान यांच्या हल्ल्यातील तिघांना अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 23:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे वागळे इस्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर दहा दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर यातील हल्लेखोर पसार झाले होते. यातील गोविंद चव्हाण (२१) आणि कुणाल चव्हाण (१८) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रवादीचे आझम खान यांच्या हल्ल्यातील तिघांना अखेर अटकराष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे वागळे इस्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर दहा दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर यातील हल्लेखोर पसार झाले होते. यातील गोविंद चव्हाण (२१) आणि कुणाल चव्हाण (१८) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. तर तिसऱ्या अल्पवयीन हल्लेखोरालाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली.आझम खान हे १२ जुलै २०२१ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आपल्या पुतण्यासह मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाºया मार्गावरुन साकेत सेवा रस्त्याने भिवंडीच्या दिशेने काही कामानिमित्त टेम्पोने जात होते. त्याचवेळी मोटारसायकलीवरुन आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर पूर्ववैमनस्यातून तलवार आणि लोखंडी सळईने हल्ला केला होता. यात खान हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यातील हल्लेखोरांच्या अटकेसाठी राष्टÑवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी तीव्र आदोलनाचा इशारा दिला होता. यासाठी कापूरबावडी पोलीस ठाण्यात १८ जुलै रोजी परांजपे यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांची भेटही घेतली होती. यावेळी खान यांची पत्नी आणि आई देखिल उपस्थित होती. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन त्यांनी मागे घेतले होते.दरम्यान, या हल्लेखोरांच्या शोधासाठी कापूरबावडी पोलिसांची तीन पथके निर्माण केली होती. हल्लेखोरांनी वापरलेल्या मोटारसायकलीला नंबरप्लेटही नव्हती. शिवाय, यात आरोपीचा पकोणताही दुवा नव्हता. हल्लेखोर आलेल्या मार्गावरील तब्बल ३५ सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी पोलिसांनी केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक संजय निंबाळकर आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय पाटील आणि जमादार मोरे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीच्या तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २१ जुलै रोजी कापूरबावडीतील आमराईनगर येथून गोविंद चव्हाण आणि कुणाल चव्हाण या दोघांना अटक केली. तर त्यांचा अन्य एक १७ वर्षीय अल्पवयीन साथीदार याला हाजूरीतून ताब्यात घेतले आहे. गोविंद आणि कुणाल या दोघांनाही ठाणे न्यायालयाने २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर अल्पवयीन साथीदाराला चार दिवस भिवंडीतील निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडी बाल न्यायालयाने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी