हल्ल्यातील तिघांना अटक
By Admin | Updated: March 31, 2017 06:14 IST2017-03-31T06:14:48+5:302017-03-31T06:14:48+5:30
कोपरी कोळीवाडा येथील भावेश वाघुले (२०) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वागळे इस्टेट गुन्हे शाखेने तिघांना

हल्ल्यातील तिघांना अटक
ठाणे : कोपरी कोळीवाडा येथील भावेश वाघुले (२०) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वागळे इस्टेट गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. राज ऊर्फ राजा किसन सोनार (२०), रा. वागळे इस्टेट, अनिकेत संजय शिंदे (२०) रा. कोपरी आणि अभिषेक विनोद माचरे (२१) रा. वागळे इस्टेट अशी त्यांची नावे आहेत.
सोमवार, २७ मार्च २०१७ रोजी रात्री १०-१५ जणांच्या जमावाने भावेश यांच्यावर प्राणघातक हल्ला करत त्याला गंभीररीत्या जखमी केले. या वेळी त्या जमावाने त्यांच्यावर चॉपरने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. दरम्यान, कोपरी पोलीस ठाण्यात १०-१५ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील काही जण रायलादेवी तलाव परिसरात येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना मिळाली, त्यानुसार, सापळा रचून त्या तिघांना अटक के ली. हल्ला केला असल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)