शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

एमडी पावडरप्रकरणी नाशिकमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारास तिघांना ठाण्यात अटक ; साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 20:36 IST

ठाणे शहर पोलिसांच्या कारवाईत अंमली पदार्थ नेणारा नाशिकातील रेकॉर्डवरील हाती लागला आहे. तसेच हा साठा मध्यप्रदेशातून आल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देनाशिकात अक्रम खान याच्यावर विविध १८ गुन्हे दाखलहा साठा मध्य प्रदेशात आल्याचे तपासात पुढे

ठाणे : नाशिकात मेफेड्रॉन (एमडी पावडर) हे अमली पदार्थविक्रीसाठी नेणा-या नाशिकमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांना ठाणे पोलिसांना अटक केली. त्यांच्याकडून ८२२ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली असून त्याची किंमत १६ लाख ४४ हजार रुपये आहे. अटकेतील नाशिकच्या गंजमाळ येथील अक्रम खान (३०) याच्याविरोधात नाशिकात विविध प्रकारचे १८ गुन्हे दाखल असून त्याच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. तसेच तो त्या गुन्ह्यात फरार असल्याची माहिती ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईत एमडीचे मध्य प्रदेश कनेक्शनही पुढे आले असून त्यानुसार पोलीस तपास सुरू आहे.नाशिक येथील रेकॉर्डवरील घरफोडी, चोरी, जबरी चोरी आणि सोनसाखळी चोरणारा सराईत गुन्हेगार अक्रम खान हा एमडी पावडरविक्रीसाठी ठाण्यातील नितीन चौक येथे येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या (गुन्हे शाखा) वागळे इस्टेट युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून अक्रमला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून १६ लाख ४४ हजारांची ८२२ ग्रॅम वजनाची एमडी पावडरही जप्त केली. तपासात त्याच्यावर नाशिक पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत घरफोडी, चोरी, जबरी चोरी, सोनसाखळी असे १८ गुन्हे दाखल असून त्याच्यावर नाशिकमधील मुंबईनाका पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. तसेच त्याच्याकडून जप्त केलेल्या एमडी पावडरचा साठा मध्य प्रदेश, इंदूर येथील रईसउद्दीन सल्लाउद्दीन शेख (४५) आणि अजय जाधवन यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार, त्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत हा साठा मध्य प्रदेशच्या बैतुल येथील भोलानामक व्यक्तीकडून घेतल्याची बाब पुढे आली आहे. अक्रम हा साठा नाशिकमध्ये नेत होता. या तिघांना ठाणे न्यायालयात हजर केल्यावर अक्रम याला ८ जानेवारी, तर रईस आणि अजय या दोघांना ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अक्रम याला या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर नाशिक पोलिसांकडे वर्ग केले जाईल, असेही अप्पर पोलीस आयुक्त रानडे यांनी सांगितले. तिघांविरोधात अमली पदार्थविरोधीचे गुन्हे दाखल आहेत का, याचे रेकॉर्ड तपासले जात आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार करत आहेत. 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबू चव्हाण, प्रदीप कदम, पोलीस हवालदार विजयकुमार गो-हे, मनोज पवार, दिलीप तडवी, सोननीस, पोलीस नाईक गायकवाड, आर.आर. पाटील, रूपवंतराव शिंदे, राजेश क्षत्रिय, दिलीप शिंदे आदी पथकाने केली.

 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस