शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 08:47 IST

नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

ठाणे : मुंब्र्यातील फेरिवाल्यांवर धडक कारवाई करणाऱ्या पालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

मुंब्र्यात फेरीवाले थेट मुख्य रस्त्यावरच बसत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेच्या वारंवार कारवाईनंतरही फेरीवाले हटत नव्हते. मात्र आहेर यांनी विशेष मोहिम राबवून फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली. त्यामुळे रस्ते फेरीवालेमुक्त झाले.  वाहतूक कोंडीचा त्रासही काहीसा कमी झाला् आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्यावतीने हटवलेल्या फेरीवाल्यांसाठी मित्तल मैदान आणि तन्वरनगर येथे तात्पुरत्या स्वरूपात मार्केट तयार करण्यात आले आहे. समाजकंटकाकडून होणाऱ्या विरोधानंतरही सहाय्यक आयुक्तांनी फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. या चांगल्या कामगिरीची पालिका आयुक्तांनी दखल घेत आहेर यांचे विशेष कौतुकही केले. शुक्रवारी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही आहेर यांचा सत्कार केला होता. मात्र आहेर यांना अनोळखी व्यक्तीने दिलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी आहेर पालिका मुख्यालयात असताना धमकीचा फोन आला. सैफ पठाण याच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घे, अनधिकृत बांधकाम तोडू नको आणि मुंब्रा गुलाब मार्केट येथील फेरीवाल्यांवर कारवाई नको करू अन्यथा बघून घेण्याची धमकी अनोळखी व्यक्तीने त्यांना दिली आहे. या धमकीनंतर आहेर यांनी तात्काळ नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.

याआधीही दोन हल्लेयापूर्वी देखील आमच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दोन हल्ले झालेले आहेत. एका लिपिकावर चॉपरने हल्ला झाला होता. यामध्ये हा लिपिक जखमी झाला होता असे आहेर यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर मी बंदोबस्ताची मागणी केली होती. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बैठकीत मुंब्रा प्रभाग समितीमधील कर्मचारी आणि सहाय्यक आयुक्तांना बंदोबस्त वाढवून देण्याबाबत अनेकदा सांगितले आहे. तरीही सुरक्षा विभागाने बंदोबस्त दिला नसल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे.    

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका