पिडीत महिलेस धमकी

By Admin | Updated: February 15, 2017 04:41 IST2017-02-15T04:41:52+5:302017-02-15T04:41:52+5:30

अत्याचार प्रकरणी फरार असलेले भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या पिडीत महिलेला त्याच्या

Threatening woman | पिडीत महिलेस धमकी

पिडीत महिलेस धमकी

मीरा रोड : अत्याचार प्रकरणी फरार असलेले भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या पिडीत महिलेला त्याच्या चालकासह भाजपा कार्यकर्त्यांनी धमकावल्या प्रकरणी काशिमीरा पोलिसात चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पिडीत महिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन २०१२ पासून सतत अत्याचार केले. तसेच अश्लील छायाचित्र व व्हिडीयो क्लीप काढून धमकावल्या प्रकरणी भोसलें विरोधात काशिमीरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. भोसले महिनाभर फरार असून अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर भोसलेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही दिलासा मिळाला नाही. उद्या सुनावणी होणार आहे. महिलेला धमकावल्याची तक्रार खोटी असल्याचा पवित्रा घेत भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश सोनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात गेले. तर पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु असल्याचे प्रभारी आर.के.जाधव म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Threatening woman