शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ठाण्यात विडी पिण्याला विरोध केल्याने संतप्त कैद्याची पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 8:40 PM

केवळ विडी ओढण्यास मनाई केल्याने संतापलेल्या एका कैद्याने बंदोबस्तावरील पोलिसांनाच शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात घडला.

ठळक मुद्देठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातील घटनापोलिसाच्या पट्टयाचेही केले दोन तुकडेठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात विडी ओढण्यास मनाई केल्याच्या रागातून आकाश तावडे या कैद्याने बंदोबस्तावर असलेल्या मुख्यालयातील पोलिसालाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. कहर म्हणजे त्याने या पोलिसाचा पट्टाही ओढून त्याचे नुकसान केले.आकाश याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात तो ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. आकाश याच्यासह सहा जणांना शनिवारी मुंबईच्या दिंडोशी न्यायालयात नेले जाणार होते. त्यासाठी सकाळी ११ वा.च्या सुमारास आलेल्या मुख्यालयातील पोलिसांनी या सहा कैद्यांना बाहेर काढले. मात्र, पावसामुळे कारागृहाच्या आवारातील शेडमध्ये पोलीस आणि कैदी थांबले. त्याचवेळी घरी कॉल करण्यास आकाशने एका पोलीस शिपायाला सांगितले. त्यास नकार दिल्यानंतर त्याने विडी पिण्यास सुरुवात केली. त्याच्या विडी पिण्याला एका महिला पोलिसासह दोघा कर्मचाऱ्यांनी विरोध केला. त्याचवेळी आकाशने त्यांना शिवीगाळ केली. याच झटापटीत त्याने एका पोलिसाचा पट्टाही ओढल्याने त्याचे दोन तुकडे झाले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच या पोलिसांनी ठाणे शहर नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिली. तेव्हा ठाणेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आकाशला नियंत्रित केले. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाjailतुरुंग