लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : न्यायालयाचा अहवाल विरोधात गेल्याच्या रागातून कोपरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्येच पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांची कॉलर पकडून त्यांना धमकावणा-या अनंत साबळे याला रविवारी पोलिसांनी अटक केली. त्याची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.साबळे याने कोपरी परिसरातील रमण बटावले, चंद्रकांत जोगळे, चंदा सणस, किरण गायकवाड, जीवन बच्छाव आणि संजय बच्छाव आदी सात जणांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. २००७ आणि २००९ मध्ये याच प्रकरणी ठाणे न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. हे सर्वजण २००७ पासून आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असून आपल्याला कोपरीतील राहत्या जागेवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप साबळे याने केला आहे. याउलट, साबळे हेच खोटे आरोप करीत पोलीस ठाण्यात आणि न्यायालयातही आमच्याविरुद्ध तक्रारी करून आम्हालाच नाहक मानसिक त्रास देत असल्याचा आरोप रमण बटावलेसह सात जणांनी १ डिसेंबर रोजी कोपरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांच्या दालनातील बैठकीत केला. मुळात, न्यायालयाचा अहवालही साबळे याच्याविरोधात गेल्याने त्याच रागानेच गावडे यांची कॉलर पकडून त्यांना धमकावले. हा प्रकार १ डिसेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. आपण दलित अपंग असून पोलीस आणि विरोधक त्रास देतात. तुम्हाला लटकवतो, तुमच्यावरही अॅट्रॉसिटी दाखल करून तुमच्याविरुद्ध कारवाई करेल, अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला. त्यांना जखमी करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर साबळेला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यायालयाचा अहवाल विरोधात गेल्याने पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्याची कॉलर धरून दिली धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 20:59 IST
तुमच्यावरही अॅट्रॉसिटी दाखल करून तुमच्याविरुद्ध कारवाई करेल, अशी धमकी देऊन कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांचीच कॉलर धरणा-या अनंत साबळे याला कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाचा अहवाल विरोधात गेल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यायालयाचा अहवाल विरोधात गेल्याने पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्याची कॉलर धरून दिली धमकी
ठळक मुद्देकोपरी पोलिसांनी केली अटकवरिष्ठ पोलीस निरीक्षकासमोरच घडला प्रकार