शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खेमानी येथे जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

उल्हासनगर : शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असताना, दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...

उल्हासनगर : शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असताना, दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिका पाणी पुरवठा विभाग मात्र याबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

उल्हासनगरात पाणी वितरण अनियमित होत असल्याने, अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली. गेल्या आठवड्यात चोपडा कोर्ट, आंबेडकरनगरमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ महिला रस्त्यावर उतरून त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रहेजा यांनी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करतो, असे आश्वासन देऊन महिलांना घरी पाठविले होते. मात्र दोन दिवसानंतरही पाणी पुरवठा नियमित झाला नसल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेवर धडक देऊन पाणी टंचाईबाबत जाब विचारला. शहर पूर्वेत अनेक भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, असे असताना दुसरीकडे खेमानी परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रभाग अधिकारी, प्रभाग सभापती यांच्यासह पाणी पुरवठा विभागाला माहिती देऊनही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यास कर्मचारी येत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

महापालिका पाणीपुरवठा विभाग ढिम्म असल्याने, शहरात ३० टक्केपेक्षा जास्त पाणी गळती होत असल्याचे बोलले जाते. शहरवासीयांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी काही वर्षांपूर्वी ३५० कोटींची पाणी वितरण योजना राबवून शहरभर नवीन जलवाहिन्या टाकून जलकुंभ व बुस्टर पंप मशीन बसविण्यात आले. मात्र योजना योग्य रितीने राबविली नसल्याने, पाणी वितरण योजना फसल्याची टीका होत आहे. खेमानी येथील जलवाहिनी फुटल्याबाबत विभागाचे कार्यकारी अभियंता रहेजा यांना संपर्क साधला असता झाला नाही.