शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

कृषी कायद्यांविरोधात हजारो कष्टकरी  पायी प्रवास करीत मुंबईकडे रवाना, हजारो वाहने धडकणार राजभावनावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 4:50 PM

Farmer Protest : दिल्ली येथे सुरु असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी वाहन मार्च नाशिक येथून मुंबईच्या दिशेने सुरु करण्यात आला.

कसारा -  केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी वाहन मार्च नाशिक येथून मुंबईच्या दिशेने सुरु करण्यात आला. |हा वाहन मार्च शनिवारी सायंकाळी सूमारे 20 हजार शेतकऱ्यांचा हा मार्च ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर घाट्नदेवी येथे मुक्कामी होता रविवारी 20 हजार कष्टकरी सकाळी 8:30 वाजता घाट्नदेवी ते कसारा घाट मार्गे लतीफवाडी हे 12 किलोमीटर चे अंतर पायी येत शहापूर तालुक्यात दाखल झाला . शेकडो वाहने घेऊन जाणाऱ्या सुमारे २० हजार शेतकऱ्यांनी 12 किमी चा अवघड घाट पायी प्रवास करीत व केंद्र शासनाचा निषेध नोंदवत नाशिक मुंबई लेन वर दाखल होत पुढे कसारा पासून मुंबई राजभवाना कडे वाहन मार्च सुरु केला. या मोर्चा मद्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना राज्यभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यां सहभागी झालें आहेत. हा मार्च मुंबईकडे निघाला आहे.| दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मार्च रविवारी दुपारी मुंबईला दाखल होणार आहे.

दरम्यान सोमवारी आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभा घेण्यात येणार असून त्या सभेत महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते त्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस माजी खा. हनन मोल्ला या सभेस संबोधित करणार आहेत. सभेनंतर येथे जमलेले हजारो शेतकरी दुपारी २ वाजता राजभवनाकडे कूच करणार आहेत व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. 1)शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, 2)शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, 3)वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, 4) वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे ,सुनील मालुसरे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले. विजय विशे .यांनी प्रस्तुत प्रतिनिधी ला दिली आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे