ठाणे : आभासी चलनाची (क्रिप्टोकरन्सी) निर्मिती करून त्यात गुंतवणुकीचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिसरा आरोपी विक्रम मंगेरा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने सोमवारी दुपारी अटक केली. त्याला २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.विक्रम हा गोवामार्गे बंगळुरूला जाण्याच्या बेतात होता. तो गोव्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना गोवा पोलिसांकडून मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गोवा विमानतळावरून रविवारी रात्री त्याला सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला सोमवारी ठाण्यात आणल्यानंतर अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात याआधी विक्रोळीतून ५ जून रोजी ताहा काझी याला तर त्यानंतर सचिन शेलार याला मुंबई विमानतळावरून पोलिसांनी अटक केली. शेलार हा नेपाळमार्गे सिमला येथून मुंबईत आल्यानंतर त्याची धरपकड करण्यात आली.ठाणे पोलिसांनी यापूर्वीच या कारवाईमध्ये फ्लिनस्टोन ग्रुपच्या ठाणे आणि विक्रोळीतील कार्यालयातून ५३ लॅपटॉप, मोबाइल आणि बनावट दस्तऐवज अशी मोठी सामग्री हस्तगत केली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरिएंट पार्क’ येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘फ्लिनस्टोन ग्रुप’चा सूत्रधार अमित लखनपाल आणि त्याच्या सहकाºयांनी नियोजनबद्ध कट करून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्लीतील प्रवीण अग्रवाल यांनी ४ जून रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली होती. त्यानंतर, पोलिसांनी धाडसत्र राबवून ही कारवाई केली.
आभासी चलनाद्वारे हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक: टोळीतील विक्रम मंगेराला गोव्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:39 IST
बंगळुरूला जाण्याच्या बेतात असलेला विक्रम मंगेरा गोव्यात आल्याची ठाणे पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला गोव्यातून अटक करण्यात आली.
आभासी चलनाद्वारे हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक: टोळीतील विक्रम मंगेराला गोव्यातून अटक
ठळक मुद्दे गुंतवणूकीचे अमिषमंगेरा गोव्यात आल्याची मिळाली माहितीठाणे गुन्हे शाखेची कारवाई