अस्वच्छता केल्यास हजारोंचा दंड, १०० ते १० हजार रुपये आकारणार दंड, क्लीनअप मार्शल रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:28 AM2018-01-02T06:28:29+5:302018-01-02T06:28:49+5:30

 Thousands of fine punishments, fine imposed of 100 to 10 thousand rupees, cleanup Marshal Ruju | अस्वच्छता केल्यास हजारोंचा दंड, १०० ते १० हजार रुपये आकारणार दंड, क्लीनअप मार्शल रुजू

अस्वच्छता केल्यास हजारोंचा दंड, १०० ते १० हजार रुपये आकारणार दंड, क्लीनअप मार्शल रुजू

Next

ठाणे : शहर अस्वच्छ करणाºया ठाणेकरांवर आता क्लीनअप मार्शलची नजर राहणार आहे. सोमवारपासून ते सेवेत रुजू झाले असून अस्वच्छता करणाºयांवर कडक नजर ठेवण्याबरोबरच १०० ते १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणार आहेत. यानुसार, पुढील तीन महिन्यांत ५० लाखांचा दंड पालिकेने अपेक्षित धरला आहे.
यासाठी २४५ सफाई मार्शलची नेमणूक केली आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रि या पूर्ण होऊन त्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला आहे. हे मार्शल नऊ प्रभाग समित्यांमध्ये काम करणार आहेत. दरम्यान, त्यांच्या नेमणुकीमुळे शहर अस्वच्छ करणाºया व्यक्तींकडून वसूल करण्यात येणाºया दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. शासनाने नव्या दंडवसुलीच्या रकमेला मंजुरी दिल्याची माहिती महापालिकेने दिली. केवळ उघड्यावर कचरा टाकणे, हे प्रमाण मर्यादित नसून रस्त्यांवर थुंकणे, स्नान करणे, इमारतीची मलवाहिनी अथवा जलवाहिनी फुटणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या कचºयाचे विभक्तीकरण करणे, अशा अनेक गोष्टींचे पालन न केल्यास पालिकेकडून २००५ पासून दंड वसूल करण्यात येत आहे. त्यानंतर, २०१२ मध्ये तयार केलेल्या उपविधीमध्ये नवीन दर निश्चित केले आहेत. यामध्ये १० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत दंडाची रक्कम ठरवली असून तिला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आता १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षापासून क्लीनअप मार्शलची नजर ठाणेकरांवर असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत प्रत्येक प्रभाग समितीनिहाय जनजागृती करण्यात आली होती. विविध मार्केट परिसरात व्यापाºयांना भाजी आणि फळेविक्रेत्यांना शहर तथा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले होते. तब्बल महिनाभर अशा प्रकारची जनजागृती केल्यानंतर आता सोमवारपासून ही मोहीम सुरू झाली.

अशी होणार कारवाई...
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास २०० रुपये
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रुपये
सार्वजनिक ठिकाणी अंघोळ केल्यास १०० रुपये
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्यास १५० रुपये
प्राणी आणि पक्ष्यांना खाद्यपदार्थ दिल्यास ५०० रुपये
उघड्यावर शौचास १५० रुपये
व्यावसायिक वाहने रस्त्यावर धुतल्यास १० हजार रुपये
रस्त्यावर भांडी घासल्यास किंवा कपडे धुतल्यास १०० रुपये
आजूबाजूचा परिसर आणि मैदान अस्वच्छ केल्यास १० हजार
इमारतीच्या जलवाहिनी, मलनि:सारण वाहिनी आदींची गळती होत असल्यास तक्र ार करूनही दुरुस्ती न केल्यास १० हजार दंड आकारला जाणार आहे.


ठाणे महापालिका राबवणार प्रत्येक घरासाठी शून्य कचरा मोहीम

अजित मांडके 
ठाणे : ठाणे महापालिकेने नव्या वर्षात स्वच्छ ठाणे स्मार्ट ठाणे, करण्यासाठी शून्य कचरा मोहीम राबवण्याचा विचार सुरू केला आहे. त्यानुसार, घरोघरी निर्माण होणाºया कचºयावर घरातच प्रक्रिया करून तो इतर उद्देशांसाठी वापरावा, असेही पालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार, याचा अभ्यास सुरू झाला आहे. महापालिका हद्दीत आजघडीला ८०० मेट्रीक टन कचºयाची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेकडे स्वत:चे डम्पिंग ग्राउंड नसल्याने सध्या हा कचरा खर्डी येथे टाकला जात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील काही प्रकल्प सुरू झाले असून काहींची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. असे असले तरी कचºयाची समस्या सुटणे कठीण असल्याचेच दिसत आहे. केंद्राने काढलेल्या एका परिपत्रकाचा आधार घेऊन पालिकेने आता १०० किलोग्रॅम कचºयाची निर्मिती करणाºया सोसायटीधारकांना त्याच ठिकाणी कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीने जनजागृती, प्रदर्शनाच्या माध्यमातून याची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, नव्या वर्षात आणखी एक पाऊल टाकण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. प्रत्येक घरात निर्माण होणाºया कचºयाची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावता येऊ शकते का, याचा अभ्यास आता पालिकेने सुरू केला आहे. प्रत्येक घरात साधारणपणे रोज १०० ते १५० ग्रॅम कचºयाची निर्मिती होते. घरोघरी निर्माण होणाºया ओल्या कचºयावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याचा पालिकेचा विचार आहे. एक प्लास्टिकचा डबा देऊन त्यातच एक यंत्र बसवलेले असते. त्या माध्यमातून कचºयावर प्रक्रिया करून त्यातून निर्माण होणारे पाणी किंवा इतर खत घरातील कुंड्यांमध्ये असलेल्या रोपांना खत म्हणून वापरू शकणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वीच पनवेल महापालिकेने केला असल्याने त्यानुसार आता ठाणे महापालिकादेखील त्याचा आधार घेणार आहे. ही योजना ठाणेकरांच्या पचनी पडणे कठीण असल्याने त्यासाठी पालिका जनजागृती आणि इतर माध्यमांतून प्रत्येक ठाणेकरांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करणार आहे.

Web Title:  Thousands of fine punishments, fine imposed of 100 to 10 thousand rupees, cleanup Marshal Ruju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.