‘त्या’ हवालदारास जामीन मंजूर
By Admin | Updated: March 26, 2017 04:34 IST2017-03-26T04:34:57+5:302017-03-26T04:34:57+5:30
तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेला विष्णूनगर पोलीस ठाण्यातील लाचखोर

‘त्या’ हवालदारास जामीन मंजूर
डोंबिवली : तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेला विष्णूनगर पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदार चंद्रकांत बोऱ्हाडे याला कल्याण न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
तक्रारदाराची मोटार सापडत नसल्याने त्याने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, मोटार सापडल्याने बोऱ्हाडे याने तक्र ादारावर केस दाखल न करण्यासाठी १० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम पाच हजार रु पये ठरली. त्यापैकी दोन हजार रु पये त्याने घेतले होते. शिल्लक पैशांसाठी त्याने तगादा लावला होता. त्यामुळे
तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने विष्णूनगर पोलीस ठाण्यातच सापळा रचून बोऱ्हाडे याला २२ मार्चला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. (प्रतिनिधी)