त्या २५ देवदूतांची झाली अँटिजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST2021-05-01T04:38:13+5:302021-05-01T04:38:13+5:30
मुंब्रा : बुधवारी (दि. २८) पहाटे मुंब्य्रातील कौसा भागातील प्राईम क्रिटिकेअर या रुग्णालयाला लागलेल्या आगीत ज्या चौघांचा मृत्यू झाला ...

त्या २५ देवदूतांची झाली अँटिजेन टेस्ट
मुंब्रा : बुधवारी (दि. २८) पहाटे मुंब्य्रातील कौसा भागातील प्राईम क्रिटिकेअर या रुग्णालयाला लागलेल्या आगीत ज्या चौघांचा मृत्यू झाला होता, त्यांतील हरीश सोनावणे हे कोरोना पॉझिटिव्ह होते. ही बाब उघड होताच सोनावणे तसेच इतरांना रुग्णालयाच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यासाठी ज्या स्थानिक तरुणांनी प्रशासनाला मोलाची मदत केली होती, त्या सर्व २५ तरुणांची खबरदारी म्हणून त्वरित अँटिजेन टेस्ट करण्यात आली. सुदैवाने ती निगेटिव्ह आल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता धनजय गोसावी यांनी ‘लोकमत’ला दिली.