शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अभिनेते महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर!

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 28, 2023 4:26 PM

यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे. 

ठाणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२३ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी शनिवारी गडकरी रंगायतन येथे दिली. तसेच, यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे. 

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे तर गेल्यावर्षी सचिन पिळगाकर यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते "महेश कोठारे" यांना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते महेश कोठारे याना पुरस्कार देण्यात येणार आहे.

मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी राजेश भोसले आणि हेमांगी वेलणकर यांनी परीक्षण केले. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे आदी उपस्थित होते

महेश कोठारे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला नसल्याची खंत -विनय पाटकर मी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष असताना ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे याना पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी मागणी केली होती. त्यांनी अभिनय क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक काळ घालवला त्यांना अद्याप पद्मश्री पुरस्कार देण्यात आला नाही अशी खंत सुप्रसिद्ध अभिनेते विनय पाटकर यांनी ठाण्यात व्यक्त केली. गंधार गौरव पुरस्कारामुळे त्यांना नक्कीच पद्मश्री मिळेल अशी आशाही त्यांनी यापुढे व्यक्त केली. ज्यांनी आम्हाला घडवले त्यांना गंधार गौरव पुरस्कार मिळतो याचा मला आनंद आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा असे मला मनापासून वाटते. त्याचबरोबर सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनाही हा पुरस्कार मिळावा अशी माझी मागणी आहे. कोठारे यांनी तंत्रज्ञान चित्रपटात आणले. हे पूर्वी मराठी चित्रपटात नसायचे. लक्ष्मीकांत बेर्डेला सुपरस्टार केले. त्यांचा पहिला चित्रपटचसुपर डूपर हिट ठरला. ५०-५५ पेक्षा जास्त वर्षे काम करणारे कोठारे अजूनही काम.करत आहेत असेही पाटकर म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेMahesh Kothareमहेश कोठारे