शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

यंदा नाले सफाईचा मुहूर्त पालिकेने लवकर साधला ; १० जूनपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे ध्येय

By धीरज परब | Updated: April 18, 2023 18:20 IST

१० जून आधी नालेसफाई पूर्ण केली जाणार असून ४ कोटींचा खर्च होणार आहे . 

मीरा रोड - यंदा नगरसेवकांची स्थायी समिती , महासभा नसल्याने मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाने पावसाळ्या आधीच्या नालेसफाईची निविदा व कार्यादेश आदी प्रक्रिया लवकर पूर्ण करून नालेसफाई सुरु केलेली आहे . १० जून आधी नालेसफाई पूर्ण केली जाणार असून ४ कोटींचा खर्च होणार आहे . 

मीरा भाईंदर शहरात १५५ कच्चे व पक्के नाले पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी आहेत . त्यातील सुमारे १३०  पक्के तर २५ कच्चे आहेत . नगरसेवक असले कि नाले सफाईच्या कामाच्या मंजुरी साठी आडमुठेपणा केला जाण्याचे अनुभव असल्याने प्रत्यक्ष कामास सुद्धा विलंब होत असे . यंदा प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाने नाले सफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश आशापुरा कन्स्ट्रक्शन कंपनीला देऊन १७ एप्रिल पासून नाले सफाईच्या कामास सुरवात झाली आहे . 

आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात महत्वाचे व अत्यावश्यक असलेले नाले साफ केले जातील . दुसऱ्या टप्प्यात त्यापेक्षा कमी महत्वाचे व नंतर उरलेले सर्व नाले साफ करणार आहोत .  ज्या ठिकाणी यंत्राने नालेसफाई होत नव्हती त्या गणेश देवल नगर भागात पहिल्यांदाच अडथळा ठरलेली ४ बेकायदा बांधकामे तोडण्यात आली आहे . या शिवाय महाजन वाडी , डाचकूल पाडा भागात देखील नालेसफाई कामात अडथळा ठरणारे बांधकामे तोडल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी सांगितले . 

कामात बालकामगार प्रतिबंधित केले असून नाल्यातून निघणाऱ्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदार वर आहे . कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षक यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे डॉ . पानपट्टे म्हणाले .