शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रोखे विरुद्ध न्याय यात्रा अशी लढाई; माजी मंत्री जयराम रमेश यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 05:35 IST

"या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांकरिता काँग्रेस जनादेश मागत आहे"

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय यात्रा नसून वैचारिक यात्रा आहे. आतापर्यंत या यात्रेने १६ राज्यांतील ११० जिल्ह्यांतून सहा हजार किमी अंतर पार केले. त्याचवेळी भाजपने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून सहा हजार कोटींचा पैसा गोळा केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील लढाई ही सहा हजार कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड विरुद्ध सहा हजार किमी न्याय यात्रा अशी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी केले.

जयराम रमेश म्हणाले की, या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांकरिता काँग्रेस जनादेश मागत आहे. युवा, महिला, किसान, श्रमिक व हिस्सेदारी न्याय हे पाच निवडणुकीचे मुद्दे राहणार आहेत. भाजपने आता आमची खाती बंद केली. आम्ही जनतेकडून पैसे जमवले आहेत, परंतु आमची खाती गोठवल्याने ते आम्हाला खर्च करता येत नसल्याचेही ते म्हणाले.

 काँग्रेसला पांगळे करण्याचा कट भाजपवाले आखत असल्याची टीका रमेश यांनी केली. ज्या कंपनीचा नफा २० कोटींचा आहे, ती कंपनी २०० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे कसे खरेदी करते.  रोखे खरेदीतील काही कंपन्या पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित आहेत, असा आरोपही त्यांनी केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्वेषाचे राजकारण करीत आहेत. मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही रमेश यांनी केला. 

आनंद आश्रमासमोर झळकले काँग्रेसचे झेंडे

राहुल गांधी ठाण्यात आल्याने त्यानिमित्ताने शहरात पोस्टर लावण्यात आले होते. तसेच प्रथमच टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे काँग्रेसचे झेंडे झळकले होते. शरद पवार गटाचे झेंडेही येथे लागले होते.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी