शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ‘सिझर’ बारवर गुन्हे अन्वेषण विभागाची धाड: १८ बारबालांसह ३२ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:53 IST

रात्री ९.३० पर्यंत चार मुलींना बारमधील कामासाठी ठेवण्याची अनुमती असतांना वागळे इस्टेट येथील या बारमध्ये १८ मुली आढळल्या. त्यातील नऊ मुलींना तर एका अरुंद पोकळीमध्ये लपविल्याचे धाडीत उघड झाले.

ठळक मुद्देधाडीपूर्वीच अरुंद पोकळीमध्ये मुलींना लपविलेपोकळीतून ९ मुलींची सुटकादोघांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

ठाणे: गि-हाईकांसमोर अश्लील चाळे करीत रात्री उशिरापर्यं बारमध्ये थांबलेल्या १८ बारबालांसह ३२ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने अटक केली आहे. कारवाईच्या भीतीने एका अरुंद पोकळीत लपविलेल्या नऊ मुलींचीही सुटका या पथकाने केली.वागळे इस्टेट येथील अ‍ॅपलॅब कंपनीसमोरील कृष्णा को आॅपरेटीव्ह या इमारतीमध्ये असलेल्या ‘सिझर पार्क’ या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली गिºहाईकासमोर बारबाला अश्लील वर्तन करीत असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४ वा. च्या दरम्यान या पथकाने कारवाई करुन बारचा चालक विश्वनाथ शेट्टी, व्यवस्थापक गणेश शेट्टी यांच्यासह १४ जणांना तसेच नऊ बार बालांना ताब्यात घेतले. त्यानंतर एका अरुंद पोकळीतून आणखी ९ बार बालांचीही त्यांनी सुटका केली. ठाणे न्यायालयाने विश्वनाथ आणि गणेश शेट्टी वगळता सर्वांची जामीनावर सुटका केली आहे. पोलिसांच्या छाप्यानंतर या मुली मिळू नयेत म्हणून त्यांना एका अरुंद पोकळामध्ये लपवून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघांवरही गुन्हे दाखल केल्याने त्यांना न्यायालयाने जामीन नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.अशी होती पोकळी अरुंदबारमध्ये रात्री ९.३० वा. पर्यंत चार मुलींना लेडीज सर्व्हिस साठी अधिकृतरित्या परवानगी आहे. बार मालकाने रात्री १२ नंतरही चक्क १८ मुलींना याठिकाणी ठेवले होते. त्यातील ९ मुलींना तर एका लाकडाच्या कपाटातील अरुंद चार पोकळयांमध्ये लपवून ठेवल्याचे या धाडीत उघड झाले. पोलिसांनी संशयित कपाट तोडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या पोकळीतून बाहेर पडण्यासाठीही एक छुपा मार्ग होता.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा