तिसरे लग्न करू पाहणाऱ्याचे आई-वडिल ताब्यात
By Admin | Updated: January 25, 2017 04:54 IST2017-01-25T04:54:24+5:302017-01-25T04:54:24+5:30
ठाण्यातील एका युवतीशी तिसरे लग्न करू पाहणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील त्या लखोबाच्या आई-वडिलांना ठाणे पोलिसांनी मंगळवारी ताब्यात

तिसरे लग्न करू पाहणाऱ्याचे आई-वडिल ताब्यात
ठाणे : ठाण्यातील एका युवतीशी तिसरे लग्न करू पाहणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील त्या लखोबाच्या आई-वडिलांना ठाणे पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.
निरज सुर्यवंशी हे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याने दोन मुलींशी विवाह करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर ठाण्यातील एका मुलीशी आॅक्टोबर २0१६ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर हुंडा म्हणून मुंबईत फ्लॅट देण्याची मागणी त्याच्या आई-वडिलांनी केल्यानंतर मुलीच्या पालकांनी चौकशी केली असता निरजचे खरे रुप समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, आई आणि डॉक्टर असलेल्या त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यासाठी कोपरी पोलिसांचे पथक भुसावळ येथे गेले होते. (प्रतिनिधी)